
निवडणुकीत झालेल्या मत चोरीच्या आरोपांमुळे देशात खळबळ आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना दावरून हटवण्याचा प्रस्ताव येणार असल्याची चर्चा आहे
जर मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवायचे असेल तर काय प्रक्रिया आहे, जाणून घ्या
बिहारमधील स्पेशल इंटेंसिव रिवीजन (SIR) आणि ‘मत चोरी’च्या आरोपांमुळे देशात राजकीय वादळ उठले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत विरोधकांचे आरोप फेटाळले आणि राहुल गांधींचे नाव न घेता त्यांना प्रतिज्ञाप्रत्र सादर करण्यास किंवा माफी मागण्यास सांगितले. या वादाने निवडणूक आयोग आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला असून काँग्रेससह विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.