Neha Hiremath Murder Case: देशात राजकीय खळबळ उडवणारे नेहा हत्या प्रकरण काय आहे? पंतप्रधान मोदींनीही प्रचारात केला उल्लेख

Neha Hiremath Murder Case: फैयाज आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. फैयाजने पोलिसांना सांगितले की, नेहा गेल्या काही दिवसांपासून अचानक त्याच्यापासून दूर राहू लागली होती, त्यामुळे त्याने ही घटना घडवली.
Neha Hiremath Murder Case
Neha Hiremath Murder Caseesakal

भारतात लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण आहे. 19 एप्रीलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान देखील झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तयारी सुरु आहे. नेत्यांच्या जोरदार सभा सुरु आहेत. मात्र देशात खळबळ माजली ती कर्नाटकमध्ये झालेल्या नेहा हत्या प्रकरणामुळे...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील एका सभेत नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया... Neha Hiremath Murder Case

फैय्याज खोंडूनाईक याने 18 एप्रिल 2024 रोजी कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील बीव्हीबी कॉलेज कॅम्पसमध्ये काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ हिची हत्या केली होती. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी कसा तरी नेहाला रुग्णालयात नेले, मात्र घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत नेहाचा मृत्यू झाला. नेहा या कॉलेजमध्ये एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती आणि फैयाज हा नेहाचा माजी वर्गमित्र होता. पोलिसांनी पैायाजला ताब्यात घेतले आहे.

फैयाज आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. फैयाजने पोलिसांना सांगितले की, नेहा गेल्या काही दिवसांपासून अचानक त्याच्यापासून दूर राहू लागली होती, त्यामुळे त्याने ही घटना घडवली. (Crime News)

पोलीस आयुक्त रेणुका एस. सुकेमार यांनी सांगितले, आमच्याकडे एफआयआर नोंदवल्यानंतर एका तासाच्या आत आम्ही आरोपीला अटक केली. सध्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपूर्ण कर्नाटकात राजकीय संताप

नेहा हिरेमठच्या हत्येनंतर  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अनेक संघटनांनी निदर्शने सुरू केली आहेत आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी या संपूर्ण घटनेला लव्ह जिहादचे प्रकरण म्हटले आहे. आरोपींनी तिच्या मुलीला अडकवण्याचा कट रचला होता आणि नेहालाही धमकावले जात होते, असा त्यांनी दावा आहे. आमच्या मुलीने या धमक्यांकडे लक्ष दिले नाही, असे निरंजन हिरेमठ यांनी सांगितले.

Neha Hiremath Murder Case
Arvind Kejriwal: "केजरीवाल यांना तुरुंगात इन्शुलिन दिले जात नाही," आम आदमी पक्षाचा आरोप

लव्ह जिहादचा अँगल देण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या हत्येला लव्ह-जिहादचे नाव देण्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ही हत्या वैयक्तिक कारणांसाठी करण्यात आली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित आहे. दुसरीकडे, कर्नाटकचे गृहमंत्री डॉ जी परमेश्वरा यांनीही सांगितले की, या घटनेत लव्ह जिहादचा कोणताही अँगल नाही आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,  फैय्याजच्या आईने सांगितले की, "दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मी सर्व लोकांची आणि नेहाच्या कुटुंबाचीही माफी मागते. माझ्या मुलाने जे केले आहे तो घोर अन्याय आहे. आम्हाला लाज वाटते आणि माझ्या मुलाला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे."

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष भारतात ज्या विचारसरणीचा प्रचार करत आहे, ती अत्यंत धोकादायक आहे. आमच्या मुलींवर हल्ले होत आहेत, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट होत आहेत, भजन, कीर्तन ऐकणाऱ्या लोकांवर हल्ले होत आहेत. या काही सामान्य घटना नाहीत. त्यामुळे मी बंगळुरू आणि कर्नाटकच्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही काँग्रेसपासून सावध राहा, असे मोदी म्हणाले. 

Neha Hiremath Murder Case
Arvind Kejriwal : ''केजरीवालांनी इन्सुलिन मागितलंच नाही, डॉक्टरांचाही सल्ला नाही'', तिहार जेल प्रशासनाचं उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com