गुजरातमध्ये फक्त 2 जागा जिंकल्यातरी AAP रचणार मोठा इतिहास; जाणून घ्या नेमकं 'कारण' I Arvind Kejriwal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election 2022 Arvind Kejriwal

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर म्हणजेच, उद्या घोषित केला जाणार आहे.

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये फक्त 2 जागा जिंकल्यातरी AAP रचणार मोठा इतिहास; जाणून घ्या नेमकं 'कारण'

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यातील मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान 1 डिसेंबरला पार पडलं होतं. तर, दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील 93 मतदारसंघात 63 टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी दुसऱ्या टप्प्यात वाढावी यासाठी प्रयत्न केले होते.

गेल्या निवडणुकीत भाजपला (BJP) 99 जागा तर काँग्रेसला (Congress) 77 जागा मिळाल्या होत्या. तर, अपक्ष आणि छोट्या पक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या. गुजरातच्या 2022 च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस विरोधात आपनं देखील उमेदवार उभे केले आहेत. जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार 182 जागांपैकी भाजपला 129 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 43 जागा, आपला 10 जागा व इतरांना एकही जागा न मिळण्याचा अंदाज आहे. पी मार्क या संस्थेच्या अंदाजानुसार भाजपला 138, काँग्रेसला 36, आपला 6 आणि इतरांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 125 ते 130, काँग्रेसला 40 ते 50 आपला (AAP) 3 ते 5 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर रोजी म्हणजेच, उद्या घोषित केला जाणार आहे. यंदा आम आदमी पक्षानं प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, एक्झिट पोलचे निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूनं लागले नसले, तरी गुजरातमध्ये केवळ 2 जागा आपनं जिंकल्यास इतिहास रचला जाणार आहे.

'आप' राष्ट्रीय पक्ष होणार का?

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर एमसीडीवरही आम आदमी पक्षाचं नियंत्रण असल्याचं दिसतं. एवढंच नाही तर गोव्यात आम आदमी पक्षाला ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत केजरीवाल यांच्या पक्षाला दुसऱ्या राज्यात मान्यता मिळाल्यास त्याला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे.

हेही वाचा: Supreme Court : 'न्यायालय शांत बसणार नाही'; नोटाबंदीविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

देशात तीन प्रकारचे पक्ष

देशात तीन प्रकारचे पक्ष आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि प्रादेशिक पक्ष. देशातील राष्ट्रीय पक्षांबद्दल बोलायचं झालं तर त्यापैकी फक्त सात आहेत. 35 राज्यस्तरीय पक्ष आणि 350 हून अधिक प्रादेशिक पक्ष आहेत.

राष्ट्रीय पक्ष कसा तयार होतो?

भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. यासाठी तीन अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. जो पक्ष यापैकी एकही अट पूर्ण करतो, त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

हेही वाचा: Delhi MCD Election Result : 'आप'च्या ट्रान्सजेंडर उमेदवारानं काँग्रेस उमेदवाराचा तब्बल 'इतक्या' मतांनी केला पराभव

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणत्या तीन अटी आहेत?

  • पहिली अट - तीन राज्यांच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 2 टक्के जागा मिळणं गरजेचं आहे.

  • दुसरी अट - लोकसभेच्या 4 जागांव्यतिरिक्त एखाद्या पक्षाला लोकसभेत 6 टक्के मतं किंवा विधानसभा निवडणुकीत किमान चार अथवा अधिक राज्यांमध्ये 6 टक्के मतं मिळाली पाहिजेत.

  • तिसरी अट - चार किंवा अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळावी.

हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

राष्ट्रीय पक्ष बनल्यास काय फायदा होणार?

कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला तर त्याचे अनेक फायदे आहेत. पक्षाला संपूर्ण देशात आरक्षित निवडणूक चिन्ह मिळतं. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढू शकते.