नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

वृत्तसंस्था
Saturday, 21 December 2019

या दोन्ही मुद्द्यांवर मुस्लिम समुदायाचा विरोध लक्षात घेता नितीशकुमार यांनी भूमिका बदलल्याचे बोलले जाते.

पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नितीशकुमार यांना एनआरसीबाबत प्रश्न विचारल्यावर "बिहार में एनआरसी काहे का?' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल केंद्र सरकारच्या पाठीशी उभा होता. या दोन्ही मुद्द्यांवर मुस्लिम समुदायाचा विरोध लक्षात घेता नितीशकुमार यांनी भूमिका बदलल्याचे बोलले जाते.

नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा आणखी तीव्र झाला आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. दिल्लीप्रमाणेच यूपीत काही भागांत इंटरनेट सेवा थांबविण्यात आली असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What NRC Nitish Kumars Big Hint That Another BJP Ally Differs