Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

बंगळूर आणि दिल्लीत पोलिस व आंदोलकांमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की आज देश या घटनांचे कौतुक करत आहे. नक्की काय घडलं असं?

बंगळूर : सध्या देशातील वातावरण नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून पेटलेलं असताना काही ठिकाणी मात्र आश्चर्यकारक घटना घडताना दिसत आहेत. बंगळूर आणि दिल्लीत पोलिस व आंदोलकांमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की आज देश या घटनांचे कौतुक करत आहे. नक्की काय घडलं असं?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बंगळूरमधील टाऊन हॉल परिसरात वातावरण अत्यंत तंग होते. आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले होते. अशातच बंगळूर पोलिस ती आंदोलन थांबवण्यासाठी व जागा रिकामी करण्यासाठी त्या ठिकाणी आले. मात्र आंदोलक काही केल्या ऐकेनात. मग बंगळूरचे पोलिस उपायुक्त चेतन सिंग राठोड यांनी आंदोलकांशी शांततेत संवाद साधला. आंदोलकांनीही अत्यंत शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरवात केली. पोलिस उपायुक्तांनीही आंदोलकांसोबत त्यांच्याबरोबरीने राष्ट्रगीत म्हणले आणि सगळे वातावरण शांत झाले. त्यानंतर आंदोलन शांतीत पार पडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आंदोलकांनी तिरंगा उंचावल्यानंतर वाचला पोलिसाची जीव!

असाच काहीसा प्रकार दिल्लीत घडला. जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. तेथेही पोलिस पोहोचले व त्यांनी आंदोलकांसोबत राष्ट्रगीत म्हणले. हे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात आंदोलकांसह पोलिसांचेही कौतुक होत आहे.

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

गेले 4-5 दिवस या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जामिया मिलीया विद्यापीठ व अलिगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. याला देशभरातून विरोध झाला. त्यानंतर पोलिस व आंदोलकांमधील हे असे संबंध बघून पुन्हा एकदा देशभरातून त्यांचे कौतुक होत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police sung National Anthem with protesters at Banglore