Independence Day 2023 : भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?

भारत आणि पाकिस्तान हे जर का आज एक असते तर भारताचे दृश्य कसे असते याचा विचार कधी तुम्ही केलाय का?
Independence Day 2023
Independence Day 2023esakal

Independence Day 2023 : फाळणीनंतर भारत पाकिस्तान वेगळे झालेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान हे जर का आज एक असते तर भारताचे दृश्य कसे असते याचा विचार कधी तुम्ही केलाय का ? जाणून घेऊया दोन्ही देशाचे विभाजन झाले नसते तर आज देशाचे चित्र नेमके कसे असते. (what would be india look like today as a union nation if india pakistan had never been separated)

भारतीय सेना असती सगळ्यात मजबूत

एका अविभागीय भारताची सगळ्यात महत्वाची बाब असती भारतीय सेना. कारण जगातील सगळ्यात मजबूत सेनेमध्ये RAW (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) आणि ISI (इंटर सर्विसेस इंटेलिजंस) ने देशाच्या सुरक्षेसाठी मिळून काम केले असते.

Independence Day 2023
Independence Day 2023

जम्मू काश्मीर मुद्दा उठला नसता

भारत अविभाजित असता तर काश्मीर मुद्दाही उठला नसता आणि भारत पाकिस्तानमध्ये काश्मीरला घेऊन आज वादही नसते. तसेच चीन काश्मीरच्या एका भागावर अधिपत्यही नसतं. दोन्ही देश आज एक असते.

Independence Day 2023
Independence Day 2023

खेळातही भारत असता पुढे

भारतीय क्रिकेट टिम आज आहे त्यापेक्षाही दुप्पट दमदार असती. तसेच आंतरराष्ट्रीय तुर्नामेंटमध्ये भारताचा भारी पगडा असता. भारत हॉकी खेळातही आज पुढे असता.

Independence Day 2023
Independence Day 2023

अल्पसंख्यकांचं संरक्षण

हिंदू किंवा ख्रिश्चन अशा अल्पसंख्याकांची रक्षा करण्यास पाकिस्तान बऱ्याच वेळा अपयशी ठरला आहे. पाकिस्तानात अशा अल्पसंख्याकांवर हल्ला झाल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. धर्मनिरपेक्ष भारतात असं झालं नसतं. सर्व धर्माच्या लोकांचे अधिकार आणि हक्कांची रक्षा केली गेली असती.

Independence Day 2023
Independence Day 2023

महिला सशक्तीकरण

अविभाजित भारतात पुरुषप्रधान समाजाची निर्मितीच झाली नसती. महिलांना सशक्तीकरणाच्या जास्त संधी मिळाल्या असत्या.

Independence Day 2023
Independence Day 2023

धार्मिक एकता

भारत अविभाज्य असता तर भारतात धार्मिक हिंसा कमी झाली असती आणि कुठलाही राजकीय नेता पाकिस्तानात जा असं म्हणू शकला नसता.

Independence Day 2023
Independence Day 2023

शिक्षण आणि आरोग्य

भारत अविभाजित असता तर सुरक्षा क्षेत्रात जेवढे पैसे आज खर्च होत आहेत तेवढे ते भारताच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात खर्च झाले असते.

Independence Day 2023
Independence Day 2023

'बॉर्डर' आणि 'बजरंगी भाईजान'सारख्या चित्रपटांचा जन्म झाला नसता

बॉलीवुडमध्ये 'बॉर्डर' आणि 'एलओसी' सारख्या चित्रपटांचा जन्म झाला नसता. पाकिस्तानी अभिनेते आणि गायक निवांत काम करू शकले असते आणि त्यांना त्यांच्या देशात वापस जा म्हणणारे लोक उदयास आले नसते.

Independence Day 2023
Independence Day 2023

भारत आणि पाकिस्तान एक असते तर भारताचं चित्र आज वेगळं असतं. भारत आणि पाकिस्तान एक असता तर या दोन देशांतील लोकांमध्ये जे वाद आहेत ते टोकाला गेले नसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com