WhatsAppनं बंद केले ५० लाख अकाउंट्स!; सुरक्षा अहवालातून कारण आलं समोर

व्हॉट्सअॅप अकाउंट्स बंद करण्यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घ्या सविस्तर
WhatsApp
WhatsAppSakal

WhatsAppनं गेल्या महिन्यात सुमारे ५० लाख अकाउंट्स बंद केली आहेत. युजर्सच्या तक्रारीवरुन ही अकाउंट्स बंद करण्यात आल्याचं व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर सेफ्टी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मार्च महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपनं ही कारवाई केली आहे. (WhatsApp banned around 5 million accounts need to know what report says)

फोननंबरद्वारे भारतीय खाती ओळखली जातात

व्हॉट्सअॅपच्या मासिक अहवालानुसार, भारतातील व्हॉट्सअॅप खात्यांची ओळख +91 फोन नंबरद्वारे केली जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही भारतीय फोन नंबरसह WhatsApp वापरत असाल आणि त्याच्या सेवा अटी किंवा भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत असाल, तर तुम्ही चॉपिंग ब्लॉकवर असू शकता.

WhatsApp
Barsu Refineray: उद्योगमंत्री सामंत अन् शरद पवार भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या

WhatsApp IT नियमांचे पालन करते

WhatsApp च्या कृती माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021च्या नियम 4(1)(d) आणि नियम 3A(7) नुसार काम करते. कंपनीनं पारदर्शकता आणण्यासाठी अकाउंट्सवर कारवाई केल्याचा हा अहवाल प्रकाशित केला आहे. भारतातील युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि अपील समितीकडून मिळालेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.

WhatsApp
Amit Thackeray: "आपण लवकरच सत्तेत असू"; अमित ठाकरेंनी मनसेच्या कामगार मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

"WhatsApp हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप गैरवर्तन रोखण्यासाठी अव्वलस्थानी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. आमच्या युजर्सना आमच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी IT नियम 2021 नुसार, आम्ही आमचा मार्च 2023 महिन्याचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, WhatsAppने मार्च महिन्यात 4.7 दशलक्ष खात्यांवर बंदी घातली आहे" असं व्हॉट्सअॅपनं एका निवेदनात म्हटलं आहे.

WhatsApp वर सुरक्षित रहा

तुम्हाला जर तुमचं WhatsApp अकाउंट बंद होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही अॅपच्या सेवा, अटी किंवा भारतीय कायद्यांचं उल्लंघन करत नाही आहात हे निश्चित करा. तसेच, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर काय शेअर करता याची काळजी घ्या कारण यामुळं तुमच्या खात्यावर कारवाई केली जाऊ शकते, असंही व्हॉट्सअॅपनं आपल्या निवदेनात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com