esakal | ऑगस्टमध्ये व्हॉटसअ‍ॅपने बंद केले २० लाखापेक्षा जास्त भारतीय अकाऊंटस | Whatsapp
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

ऑगस्टमध्ये व्हॉटसअ‍ॅपने बंद केले २० लाखापेक्षा जास्त भारतीय अकाऊंटस

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: ऑगस्ट महिन्यात व्हॉटसअ‍ॅपने (whatsapp) २० लाखापेक्षा जास्त अकाऊंटस बंद केले आहेत. व्हॉटसअ‍ॅपचा महिन्याचा जो अहवाल आहे, त्यानुसार लोकप्रिय मेसेंजिग अ‍ॅप (messaging app) असलेल्या व्हॉटसअ‍ॅपला ऑगस्ट महिन्यात ४२० तक्रारी प्राप्त झाल्या. प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार, व्हॉटसअ‍ॅपने ऑगस्ट महिन्यात २० लाख ७० हजार भारतीय अकाऊंटस बंद (account ban) केले. फोन नंबरच्या आधी सुरु होणाऱ्या +91 कोडने भारतीय अकाऊंटसची (indian whatsapp account) ओळख पटवण्यात आली.

हेही वाचा: Petrol-Diesel Hike |देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम

इनस्टंट मेसेंजिग अ‍ॅपमध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉटसअ‍ॅपची मालकी फेसबुककडे आहे. फेसबुक जगातील एका सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी आहे. व्हॉटसअ‍ॅपने भारतात १६ जून ते ३१ जुलै दरम्यान ४६ दिवसात ३० लाख २७ हजार व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट बंद केले आहेत. व्हॉटसअ‍ॅपने नव्या आयटी नियमांचे पालन सुरु केले आहे.

हेही वाचा: बजेटमध्ये बसणारे 'हे' 5 परफेक्ट डेस्टिनेशन, एकदा भेट द्याच!

यामुळे Whatsapp ने बॅन केले अकाऊंटस

९५ टक्क्यापेक्षा अधिक खात्यांमधून Bulk Messages चा अनधिकृत वापर करण्यात आल्यामुळे खाती बंद करण्यात आल्याचे व्हॉटसअ‍ॅपने याआधी सांगितले होते. जागतिक स्तरावर व्हॉटसअ‍ॅप दर महिन्याला आपल्या मंचाचा दुरुपयोग केल्याबद्दल सरासरी ८० लाख अकाऊंटसवर कारवाई करतो. भारतातून आपल्याला दोन प्रकारच्या तक्रारी मिळाल्याचे Whatsapp ने सांगितले.

हेही वाचा: गांधी जयंतीला नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेंड, काँग्रेसचा आक्षेप

त्याशिवाय फेसबुकने शुक्रवारी जाहीर केलेल्या अनुपालन रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी ३.१७ कोटी कंटेटवर कारवाई केली. त्याचवेळी इन्स्टाग्रामने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला २२ लाखापर्यंत कंटेट हटवला. फेसबुकला १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भारतीय तक्रार तंत्राच्या माध्यमातून ९०४ रिपोर्ट मिळाले. तीन कोटीपेक्षा अधिक कंटेटमध्ये स्पॅम (२.९कोटी), हिंसक (२६ लाख), अॅडल्ट, न्यूडिटीशी संबंधित (२० लाख), हेट स्पीच (२,४२०००) सह अन्य मुद्यांशी संबंधित कंटेट असल्याचे फेसबुकने आपल्या अनुपालन रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

loading image
go to top