व्हॉट्‌सऍपची पेमेंट सुविधा लवकरच ?

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर "व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे. 

नवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर "व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे. 

भारतातील व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांची संख्या सुमारे 20 कोटी आहे. त्यांना पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असून, त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्‌सऍप प्रयत्नशील आहे. ही सुविधा सुरू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर 10 लाख युझर्सद्वारे याची चाचणी घेण्यात आली आहे. तत्पूर्वी व्हॉट्‌सऍपची प्रतिस्पर्धी कंपनी "गुगल'ने भारतात यापूर्वीच आपली पेमेंट सुविधा सुरू केली असून, रिझर्व्ह बॅंकेकडून परवानगी मिळाल्यानंतर व्हॉट्‌सऍपच्या युझर्सनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

दरम्यान, पेमेंट सुविधेसाठी विविध बॅंका, तसेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत बोलणी सुरू असल्याची माहिती व्हॉट्‌सऍपच्या प्रवक्‍त्याने दिली. मध्यंतरी व्हॉट्‌सऍपवरील फेक संदेशांमुळे जमावाकडून हत्यांचे प्रकार समोर आल्यानंतर व्हॉट्‌सऍपवर टीकेची झोड उठली होती. सरकारने याची दखल घेत ठोस उपाय योजनेच्या सूचना व्हॉट्‌सऍपला केल्या होत्या. 

डिजिटल पेमेंट क्षेत्रातील रस्सीखेच 

भारतातील डिजिटल पेमेंट व ई वॉलेट सेगमेंटमध्ये पेटीएम, गुगल पे, फोन पे अशा विविध कंपन्यांनी अगोदरपासून आपले पाय घट्ट रोवले आहेत. या कंपन्यांसोबत विविध बॅंकांची ऍपही कार्यरत असून, अशात व्हॉट्‌सऍपचा समावेश झाल्यानंतर या क्षेत्रातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp payment facility will soon