Pravasi Bhartiya Divas 2024 : प्रवासी भारतीय दिवस का आहे खास? जाणून घ्या महत्व

भारताच्या विकासात या अनिवासी भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा उत्सव म्हणून हा प्रवासी भारतीय दिवस किंवा NRI दिवस साजरा केला जातो.
Pravasi Bhartiya Divas 2024
Pravasi Bhartiya Divas 2024esakal
Updated on

Pravasi Bhartiya Divas 2024 : नवीन वर्षाची सुरूवात होताच जगभरात राहणारे भारतीय त्यांच्या मातृभूमीत किंवा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मस्थानाला भेट देण्याचे प्लॅनिंग करतात. कारण, याचे निमित्त असते ते म्हणजे प्रवासी भारतीय दिवस. भारतात दरवर्षी हा प्रवासी भारतीय दिवस ९ जानेवारीला साजरा केला जातो.

आज प्रवासी भारतीय दिवस आहे. भारताच्या विकासात या अनिवासी भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा उत्सव म्हणून हा प्रवासी भारतीय दिवस किंवा NRI दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यानंतर, त्यांनी भारतीयांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याची ज्योत जागवली होती.

यासोबतच, हा दिवस प्रवासी भारतीयांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि जगभरातील भारतीय समुदायातील संबंध मजबूत करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे, या दिवसाचे खास असे महत्व आहे.

प्रवासी भारतीय दिनाचा इतिहास काय?

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी २००२ मध्ये हा प्रवासी भारतीय दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. या दिवसाला १९१५ चा इतिहास आहे. खरं तर दिवंगत कायदेतज्ज्ञ लक्ष्मी सिंघवी यांनी सर्वात आधी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानंतर सिंघवींच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेल्या उच्च समितीच्या शिफारशींनुसार हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर, २००३ मध्ये हा प्रवासी भारतीय दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. खरं तर तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. प्रवासी भारतीय दिनाचा कार्यक्रम हा परराष्ट्र मंत्रालयातर्फे, CII आणि इतर भागधारकांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.

यामध्ये, अनेक चर्चासत्रे, पॅनेल डिस्कशन, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित केले जातात. या कार्यक्रमामध्ये आमदार, खासदार, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ आणि परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायातील लोकांचा समावेश असतो.

प्रवासी भारतीय दिन आहे खास

प्रवासी भारतीय दिनाचा प्रमुख उद्देश हा भारत सरकारशी संवाद साधण्यासाठी अनिवासी भारतीयांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. जगभरातील भारतीय समुदायाचे कौशल्य, त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करणे हा एक प्रमुख हेतू यामागे आहे.

या प्रसंगी सरकार भारताची प्रगती आणि उपलब्धता यासोबतच अनिवासी भारतीयांकडून गुंतवणूक आणि व्यवसायपूरक संधी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे, या निमित्ताने शिक्षण, अर्थव्यवस्था, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात.

हा प्रवासी भारतीय दिवस खास असण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी अनिवासी भारतीयांचा सन्मान करण्याची देखील परंपरा जपली जाते. हा सन्मान अशा अनिवासी भारतीय व्यक्तीला दिला जातो, ज्यांनी भारताच्या तसेच सध्या ते राहत असलेल्या देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आणि सेवा दिली आहे. अशाच व्यक्तीला हा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com