esakal | पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास, दुसरा डोस घ्यावा का?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास, दुसरा घ्यावा का?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित (covid19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण (vaccination) हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 20 कोटींपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पण, अशी प्रकरणी दुर्मिळ आहेत. शिवाय पहिल्या डोसपेक्षा (vaccine shot) दुसऱ्या डोसनंतर कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशात लोकांना प्रश्न पडतोय की, पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास, लशीचा दुसरा डोस कधी घ्यायचा? (When can you get second vaccine shot if infected after first dose covid19)

पहिला डोस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोना झाला, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही दुसरा डोस घ्यायचा नाही. दुसरा डोस घेताना एकच काळजी घ्या. कोरोनातून बरे झाल्यानंतर कमीतकमी चार चे आठ आठवडे झाल्यानंतर तुम्ही कोविड-19 प्रतिबंधक दुसरा डोस घेऊ शकता. आरोग्य मंत्रालयाकडूच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. याशिवाय ज्या लोकांना इतर कोणता आजार झाला असेल, त्यांनी बरे झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यांनी लस घ्यावी.

हेही वाचा: महिलेला एकाचवेळी लसीचे 6 डोस दिल्याने खळबळ

देशात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. देशात दररोज 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. यात काहीशी घट झाली असली तरी चिंता कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हीच प्रभावी पद्धत असल्याचं अनेक तज्त्रांनी म्हटलंय. त्यादृष्टीने केंद्र सरकारने लसीकरणाची गती वाढवली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि 45 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे.

loading image
go to top