esakal | धक्कादायक: महिलेला एकाचवेळी लसीचे 6 डोस दिल्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

महिलेला एकाचवेळी लसीचे 6 डोस दिल्याने खळबळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रोम- इटली (Italy) देशामध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेक कोरोना प्रतिबंधक लसीचे (six doses of Pfizer ) तब्बल सहा डोस एकाचवेळी देण्यात आले आहेत. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर काही दुष्परिणाम होताहेत का, हे तपासल्यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असले तरी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Woman given six doses of Pfizer Covid vaccine shot in Italy)

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशात लसीकरण सुरु करण्यात आलंय. कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रकारानुसार डोसची मात्र ठरवण्यात येते. यात एक किंवा दोन डोस दिले जातात. दुसरा डोस देताना काही दिवसांचा कालावधी जावावा लागतो. अशात महिलेला एकाचवेळी सहा डोस देण्यात आल्याने गोंधळ उडाला. हॉस्पिटलने सांगितलं की, महिलेला लस देण्यात आल्यानंतर दाखल करुन घेण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्याकडून चुकीने इंजेक्शनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची मात्रा भरण्यात आली, त्यानंतर ती महिलेला देण्यात आली. बॉटलमध्ये सहा डोस देता येतील, इतकी मात्रा होती.

हेही वाचा: बापरे! एकाच कोरोना रुग्णाला लावले तब्बल १२ रेमडेसिव्हिर

आरोग्य कर्मचाऱ्याला लवकरच आपली चूक कळाली. महिलेला त्यानंतर २४ तास हॉस्पिटलमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या ठीक असून तिला घरी सोडण्यात आलंय . सीएनएनने यासंदर्भातील माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही दिवसांपर्यंत महिलेवर लक्ष ठेवण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे, पण हॉस्पिटल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे चुकीने घडले असून जाणूनबुजून हे करण्यात आलेलं नाही.

loading image