when cashier told no cash without mask photo viral
when cashier told no cash without mask photo viral

मास्क विसरल्यावर झाली फजिती; फोटो व्हायरल

नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्याला रोखण्यासाठी विविध ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, एक व्यक्ती बँकेत गेल्यानंतर त्यांना मास्कची विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी कुर्ता तोंडावर ओढून घेतला. संबंधित छायाचित्र व्हायरल झाले आहे.

आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी संबंधित छायाचित्र ट्विट केले आहे. या छायाचित्राला शीर्षक दिले आहे की, 'जेंव्हा कॅशिअरकडून मास्क न घातल्यास पैसै मिळणार नाही असे सांगितले जाते.' संबंधित व्यक्ती बँकेत पैसे काढण्यासाठी गेली होती. पण, कॅशिअरने मास्क नसल्यामुळे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले. यामुळे या व्यक्तीने कुर्ता तोंडावर ओढून घेतला. मास्क घालायला विसरलेल्या या व्यक्तीची फजीती झालेली दिसून येत आहे. संबंधित छायाचित्र व्हायरल झाले असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या काळात सध्या मास्क वापरणे खूप गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त झाली असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com