Video : निवडणूक प्रचारात फसली भाजपची गाडी; काँग्रेसने अशी काढली बाहेर
अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सर्वच पक्षांनी आपल्या बड्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे. तर अन्य माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही पक्षांकडून सुरू आहे. त्यातच भाजपचं प्रचार वाहन प्रचार करताना फसल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे फसलेलं वाहन बाहेर काढण्यासाठी काँग्रेस धावून आलं. (gujarat Elaction news in Marathi)
वाळूत फसलेला भाजपचं प्रचार वाहन काँग्रेसच्या प्रचार वाहनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भाजपच्या प्रचाराची गाडी वाळूत फसल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याला काँग्रेस पक्षाचे प्रचार वाहन दोरीने बांधून बाहेर काढत आहे. या व्हिडीओमुळं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मदत केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आम आदमी पार्टीने या घटनेची ट्विट करून खिल्ली उडवली आहे. 'गुजरातमधील भाजपच्या रखडलेल्या निवडणूक वाहनाला वाचवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे Ilu Ilu असल्याचं ट्विट आपच्या वतीने करण्यात आलं आहे.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.