
भारताचे माजी पंतप्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री व जगातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असलेले काँग्रेसचे द्रष्टे नेते डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान या कार्यकाळात डॉ. मनमोहनसिंग यांनी शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावली होती.
ते जवळपास १० वर्षे देशाच्या पंतप्रधान पदी राहिले मात्र त्यांच्यातील साधेपणा व नम्र स्वभाव आयुष्यभर कायम राहिला. त्यांच्या प्रामाणिक स्वभावाचा किस्सा सुप्रसिद्ध लेखक खुशवंतसिंह यांनी एके ठिकाणी लिहून ठेवला आहे.