जेव्हा एक 'मुस्लिम भक्त' भगवान रामाच्या दरबारात पोहोचला!

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 5 August 2020

राम मंदिराचे सर्वात जूने  पुजारी सत्येंद्र दास यांनी या आनंदाच्या क्षणी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एका मुस्लीम राम भक्ताचा किस्सा सांगितला आहे. 

अयोध्या- राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज उत्सवाचं वातावरण आहे. राम जन्मभूमी अयोध्यामध्ये भूमिपूजन सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राम मंदिराचे सर्वात जूने  पुजारी सत्येंद्र दास यांनी या आनंदाच्या क्षणी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एका मुस्लीम राम भक्ताचा किस्सा सांगितला आहे. 

राम मंदिर भूमीपूजन : लालकृष्ण अडवानी यांची भावनिक प्रतिक्रिया

रामलल्लांना जेव्हा गाभाऱ्यात नेले तेव्हा येणाऱ्या भक्तांना खूप प्रयत्नाने दर्शन मिळायचं. 2014 मध्ये एक मुस्लिम व्यक्ती आला होता. त्याने सांगितलं की तो तिरुपती बालाजी मंदिराचा ट्रस्टी आहे. त्याने स्वत:ला मुस्लीम असल्याचं सांगितलं नाही. त्याने दरदिवशी 11 किलो लाडू भगवान रामाला नैवेद्य म्हणून चढवायचं ठरवलं होतं. तो गॅलरीच्या रस्त्याने दर्शनासाठी गेला. नंतर अधिकाऱ्यांच्या म्हणण्याने तो व्हीआयपी रांगेत आला. 

व्यक्ती लाडू घेऊन मानस भवनपर्यंत पोहोचला, त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुढे जाऊ दिलं नाही. चौकशी केल्यानंतर कळाले की तो दिल्लीत राहणार मुस्लिम व्यक्ती आहे. तो बालाजी मंदिराचा ट्रस्टी नव्हता. त्यानंतर तो तेथून निघून गेला. त्याला अटक करण्यात आली नाही. मात्र, त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. तो भगवान रामाला नैवेद्य चढवू शकला नाही. लाडू अयोध्येतील एक दुकान चालक सीताराम यादव याच्याकडे बनले होते. त्या व्यक्तीविरोधात खटला दाखल करण्यात आला. आमची साक्ष घेण्यात आली. मुस्लीम व्यक्ती खोटं बोलून आला होता. त्यामुळे गुप्तचर विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास झाला. 

या प्रकरणामुळे विरोधाचा सामना करावा लागल्याचं सत्येंद्र दास यांनी सांगितलं. या घटनेमुळे आमच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. राम जन्मभूमीच्या पुजाऱ्याला हटवा अशी मागणी होऊ लागली. खूप दिवस हा विरोध सुरु होता. मात्र, प्रशासनाने मला हटवण्यास नकार दिला. कामावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची यात चुकी होती. त्यामुळे प्रशासनाने पुजारीला हटवायचं असेल तर न्यायालयाचा आदेश आणण्यास सांगितलं. मात्र, मला हटवण्यात आलं नाही.

अयोध्यापतींचे भव्यदिव्य मंदिर

मुस्लीम व्यक्तीने रामलल्लाचे दर्शन घेतले. पण तो गाभाऱ्यात जाऊ शकला नाही. अशा प्रकारची अडचण माझ्यासमोर आली होती. त्यानंतर सर्व काही ठिक झाले. पण हा प्रसंग माझ्या अजूनही लक्षात आहे, असं सत्येंद्र दास म्हणाले. 

आज भूमिपूजन होत असल्याने सत्येंद्र दास यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता हे निश्चित झालं आहे की अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यामुळे श्रीरामाचे भव्य मंदिर बनेल, यापेक्षा अधिक आनंदाचा प्रसंग माझ्यासाठी दुसरा कोणता असेल, असंही ते म्हणाले.

(edited by-kartik pujari)

अयोध्या राम मंदिर ayodhya ram mandir


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when muslim devote reach at ayodhya ram temple