Farmers Protest: शेतकरी नेत्यांची आज बैठक; पुढची रणनीती ठरवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra farmers talks about delhi protest
Farmers Protest: शेतकरी नेत्यांची आज बैठक; पुढची रणनीती ठरवणार

शेतकऱ्यांचं आंदोलन कधी थांबणार? आज बैठकीत रणनीती ठरणार

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी मागे घेणार असल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आपण शेतकऱ्यांना कृषी कायदे समजावू शकलो नाही असं म्हणत त्य़ांनी हे कायदे मागे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश मिळाल्याचं बोललं जातंय. आंदोलनाला यश आलं असलं तरी, शेतकरी हे आंदोलन नेमकं कधी मागे घेणार याबद्दल कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच पार्श्वभूमिवर आज पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक पार पडणार आहे.

दिल्लीच्या सीमांवर सूरू असलेल्या आंदोलनाच्या या यशानंतर काल शेतकऱ्यांकडून जल्लोश साजरा केला गेला. त्यानंतर शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी जो पर्यंत कायदे कागदावर रद्द करत नाही, तो पर्यंत आंदोलन सूरू राहील असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर आता आज शेतकऱ्यांच्या वेगवेळ्या संघटनांमध्ये बैठक पार पडणार असून, आ बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवण्यात येणार आहे. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर आज ही बैठक होणार असून, या बैठकील सर्व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर शेतकऱ्यांची पुढची रणनीती ठरणार आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा: हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी भाजप किसान मोर्चाकडून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी मथूरेमधून या रॅलीला सूरूवात होणार आहे.

loading image
go to top