
नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अज्ञातवासाबद्दल विरोधकांकडून आता सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनकड बेपत्ता असल्याचा सवाल उपस्थित करताना यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी आज केली.