first copy of indian costitution dehradun
sakal
भारतीय राज्यघटनेचा आणि उत्तराखंडची राजधानी डेहराडूनचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण ज्या संविधानानुसार देशाचा कारभार पाहतो, त्या संविधानाच्या पहिल्या छापील प्रती (Printed Copies) डेहराडूनमधील 'सर्वे ऑफ इंडिया' (Survey of India) येथे तयार झाल्या होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक वारशाचा आढावा घेणे औचित्याचे ठरेल.
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते अनेक संघर्ष आणि भावनांचे प्रतीक आहे.