Bihar Survey: नितीश कुमार भाजपसोबत गेल्याने कोणत्या आघाडीला होईल फायदा? काय सांगतो सर्वे?

Bihar Survey: नितीश कुमार एनडीएमध्ये गेल्याने याचा कोणत्या आघाडीला फायदा होईल असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहे.
Bihar Survey
Bihar Survey

नवी दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा महागठबंधनसाठी मोठा धक्का होता. त्यातच नितीश कुमार एनडीएमध्ये गेल्याने याचा कोणत्या आघाडीला फायदा होईल असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहे. यासंदर्भात एक ताजा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय की विरोधकांच्या आघाडीला यामुळे नुकसान होणार आहे तर एनडीएला याचा फायदा होईल.(Which alliance will benefit from Nitish Kumar joining BJP What does the survey say bihar)

एनडीटीव्हीकडून जारी सर्वेमध्ये सांगण्यात आलंय की, बिहारमधील सत्तापरिवर्तनानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठा फायदा होईल. नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडल्याने त्यांचे मतदार आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे वळतील. सर्वेमध्ये ५३ टक्के लोकांनी भाजप आणि जेडीयू आघाडीला समर्थन दिले आहे. दुसरीकडे लालूंची आरजेडी आणि काँग्रेसच्या आघाडीला केवळ २३ टक्के मिळताना दिसत आहेत.

Bihar Survey
Nitish Kumar : नितीश कुमार NDA मध्ये गेले पण इंडिया आघाडीकडे आहे प्लॅन बी; काँग्रेस 'यांच्या' संपर्कात

रिपोर्टनुसार, नितीश कुमार यांनी महागठबंधनची साथ सोडली नसती आणि ते भाजपसोबत गेले नसते तर चित्र वेगळे असते. जेडीयूसह महागठबंधन आणि एनडीएमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली असते. ३५-३५ टक्के लोक एनडीए आणि महागठबंधनच्या बाजूने राहिले असते. हा सर्वे वेगवेगळ्या भागात ४ हजार लोकांचे मतं विचारात घेऊन करण्यात आला आहे.

लोकसभेमध्ये एनडीए आणखी मजबूत होईल असं सर्वेमध्ये सांगण्यात आलंय. २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही नितीश कुमार आणि एनडीए यांचा पक्ष वरचढ ठरेल असं सर्वे सांगतो. ५४ टक्के लोकांना वाटतं की विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूचा विजय होईल. दुसरीकडे महागठबंधनच्या बाजूने २७ टक्के लोकांनी कौल दिला.

Bihar Survey
Nitish Kumar: नितीश कुमार यांचे 'संकटमोचक', आधी RJD सोबत सरकार आता NDA आघाडीचे कर्णधार...

नितीश कुमार यांनी २०२५ च्या पूर्वी पुन्हा एकदा गट बदलला तर महागठबंधनला फायदा मिळण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत महागठबंधनला ४१ टक्के आणि भाजपला ३८ टक्के मत मिळू शकतील. सर्वेनुसार, नितीश कुमार आल्याने भाजपला फायदाच होईल, नुकसान काहीही होणार नाही. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com