Binod आहे तरी कोण? पेटीएमनं त्याच्यामुळे ट्विटर हँडलंच नाव बदललं

binod.jpg
binod.jpg
Updated on

नवी दिल्ली - इंटरनेटवर कधी कोणत्या गोष्टींना अचानक प्रसिद्धी मिळेल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांत ट्विटरवर Binod नाव ट्रेंडमध्ये आहे. हे नाव का ट्रेंडमध्ये आलं याची माहिती नसलेल्यांनी अनेक मीम्स तयार केली. इतकंच काय या बिनोदमुळे पेटीएमने त्यांच्या ट्विटर हँडलचं नावही बदललून बिनोद असं ठेवलं. एका युजरनं पेटीएमला त्यांच्या हँडलचं नाव बिनोद करा असं म्हटलं होतं. 
 

सध्या मीम तयार करणाऱ्यांसाठी तर बिनोद टॉप प्रायोरीटी झाला आहे. ट्विटरवर बिनोदचीच चर्चा सुरू आहे. पेटीएमला Gabbbar नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून चॅलेंज देण्यात आलं होतं. त्यावर पेटीएमने डन कमेंट करत नाव बदललं. 
 

बिनोद शब्द आता ट्विटरवर किंवा मीम्समध्ये दिसत असला तरी त्याची सुरुवात युट्यूब चॅनेलच्या एका व्हिडिओमुळे झाली. Slayy Point ने एक पोस्ट केला होता. यामध्ये भारतीय युट्यूब चॅनेल्सच्या कमेंट सेक्शनमध्ये काय असतं हे दाखवलं आहे. त्यांनी 'Why Indian Comments Section is Garbage (BINOD)' असं टायटल देऊन व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये कमेंटमध्ये करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विचित्र कमेंट वाचल्या आहेत. यातच एक कमेंट होती. बिनोद, ही कमेंट बिनोद थारू नावाच्या युजरनं पोस्ट केली होती. 
 

Slayy Point चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीय युट्यूब कंटेटं क्रिएटर्सनासुद्धा त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक ठिकाणी बिनोद लिहिल्याचं दिसलं. आता यावर नेटिझन्सनी फनी मीम्स पोस्ट केल्या आहेत. यातच एकाने पेटीएमला चॅलेंज दिलं आणि पुन्हा बिनोदची चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com