कोण आहे ३२ वर्षीय हरिश राणा? सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच दिली इच्छामरणाची परवानगी, १३ वर्षांपासून लाइफ सपोर्ट सिस्टिमवर

Who is Harish Rana : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी देत ऐतिहासिक निर्णय दिलाय. गाझियाबादच्या ३२ वर्षीय हरिश राणावर गेल्या १३ वर्षांपासून उपचार सुरू आहेत.
Supreme Court Gives Landmark Ruling In Harish Rana Case

Supreme Court Gives Landmark Ruling In Harish Rana Case

Esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक निर्णय देत ३२ वर्षीय हरिश राणा याला इच्छामरणाची परवानगी दिलीय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती केवी विश्वनाथन यांच्या पीठाने ऐतिहासिक निर्णय देत हरिश राणाला एम्समध्ये दाखल करण्याचे आदेश दिले. तो सध्या लाइफ सपोर्ट सिस्टिमवर असून लाइफ सपोर्ट सिस्टिम हटवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com