

Viral Video Lands Senior IPS Officer K Ramchandra Rao In Trouble
Esakal
कर्नाटकचे पोलीस महासंचालक के रामचंद्र राव यांना अश्लील व्हिडीओ प्रकरणी निलंबित करण्यात आलंय. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असून व्हायरल व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. के रामचंद्र राव यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ २०१७मधला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीमध्ये पोलीस अधिकारी महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं दिसतं. व्हिडीओतील ती व्यक्ती के रामचंद्र राव असल्याचे आरोप होत आहेत.