Mann Ki Baat : PM मोदींचे राजकीय गुरू 'लक्ष्मणराव इनामदार' कोण आहेत ?

who is laxmanrao inamdar whom pm modi mentioned in 100th mann ki baat Who is the guru of Narendra Modi
who is laxmanrao inamdar whom pm modi mentioned in 100th mann ki baat Who is the guru of Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरातील नागरिकांशी 'मन की बात'च्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी लक्ष्मण राव इनामदार यांना त्यांचे मार्गदर्शक म्हटले. यावेळी इनामदार यांनीच सामाजिक जीवनात त्यांना मार्गदर्शन केल्याचं देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज आपण हे लक्ष्मण राव इनामदार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत.

लक्ष्मणराव इनामदार कोण आहेत?

इनामदार यांचा जन्म १९१७ मध्ये पुण्यापासून १३० किमी दूर खटाव गावातील गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ऑफिसरच्या घरात झाला. १० भावंडांपैकी एक असलेल्या इनामदार यांनी १९४३ मध्ये पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर लगेच ते आरएसएसमध्ये सहभागी झाले. त्यांनी स्वतंत्रतालढ्यात सहभाग घेतला तसेच हैद्राबादच्या निजमांविरोधातील आंदोलनात देखील नेतृत्व केलं. त्यानंतर गुजरात येथे प्रचारक म्हणून दाखल झाले. तसेच त्यांनी जीवनभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

who is laxmanrao inamdar whom pm modi mentioned in 100th mann ki baat Who is the guru of Narendra Modi
Yuzvendra Chahal : रोहितच्या बर्थ डे पार्टीत युजवेंद्र चहल टल्ली? अडखळत चालतानाचा 'तो' Video Viral

मोदी-इनामदार कधी भेटले?

तरूणपणी १९६० च्या दशकाच्या सुरूवातीला मोदी पहिल्यांदा इनामदार यांना भेटले. तेव्हा इनामदार हे १९४३ पासून गुजरात मध्ये आरएसएसचे प्रांत प्रचारक होते. त्यांचं काम राज्यातील तरुणांना आरएसएसच्या शाखेत सहभागगी होण्यासाठी प्रेरित करणे हे होतं. ते वडनगर येथे गुजराती मध्ये एका सभेला संबोधित करत होते तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच त्यांचं भाषण ऐकलं.

who is laxmanrao inamdar whom pm modi mentioned in 100th mann ki baat Who is the guru of Narendra Modi
Shiv Sena News : युवासेना प्रमुख पदावरून आदित्य-तेजस यांच्यात वाद; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

मोदी १७ वर्षांचे असताना १९६९ मध्ये हायस्कूल शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडनगरमधील घर सोडलं होतं. मोदींच्या जीवनावर पुस्तक लिहणाऱ्या लेखकांचा म्हणणं आहे की मोदी यांच्या जीवनावर जर कोणी प्रभाव टाकला असेल तर ते लक्ष्मणराव इनामदार हे आहेत.

मोदींनी समाजिक मुद्द्यांवर पकड, कडक शिस्त आणि सतत काम करण्यची क्षमता मोदींनी इनामदार यांच्याकडून शिकून घेतली. मोदींनी इनामदार यांच्याकडून योग आणि प्राणायामाची सवय लागली. इनामदार यांना वकिल साहेब म्हणून ओळखले जात असे आणि १९८४ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com