CM Pema Khandu : अरुणाचल प्रदेशात भाजपला दुसऱ्यांदा सत्ता देणारे पेमा खांडू नेमके कोण? काँग्रेसला का दिली होती सोडचिठ्ठी?

पेमा खांडू यांची ओळख एक संगीतप्रेमी आणि क्रीडाप्रेमी म्हणून आहे. पारंपरिक संगीताच्या संवर्धनासाठी राज्यस्तरावर सांगितिक स्पर्धांचे आयोजन. त्याचप्रमाणे क्रिकेट, फुटबॉल यांसह अन्य क्रीडाप्रकारांच्या सामन्यांचे आयोजन करून या क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खांडू प्रयत्नशील असतात.
Pema Khandu
Pema Khanduesakal

Peme Khandu Arunachal Pradesh Politics : अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळाल असून तब्बल दोनवेळा सत्ता मिळवून दिलेले पेमा खांडू यांची देशभर चर्चा होत आहे. २०१९मध्ये जिथे भाजपला ४१ जागा जिंकता आल्या होत्या, तिथेच आता २०२४ मध्ये भाजपने ४६ जागा जिंकल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पहिल्यांदा २०१६ मध्ये मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपसाठी विजयश्री खेचून आणला. त्यानंतर आता २०२४ मध्ये तिसऱ्यांदा खांडू यांनी स्वतःमधलं कसब सिद्ध करुन दाखवलं असून तेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Pema Khandu
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक 7 जूनला रेपो दर जाहीर करणार; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

२१ ऑगस्ट १९७९ रोजी जन्मलेल्या खांडू यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील दोरजी खांडू हेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तवांग मतदारसंघात दौऱ्यावर असताना ३० एप्रिल २०११ रोजी त्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

पेमा खांडू यांची ओळख एक संगीतप्रेमी आणि क्रीडाप्रेमी म्हणून आहे. पारंपरिक संगीताच्या संवर्धनासाठी राज्यस्तरावर सांगितिक स्पर्धांचे आयोजन. त्याचप्रमाणे क्रिकेट, फुटबॉल यांसह अन्य क्रीडाप्रकारांच्या सामन्यांचे आयोजन करून या क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खांडू प्रयत्नशील असतात.

पेमा खांडू यांची राजकीय कारकीर्द

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी २००० सालामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०११ मध्ये पेमा खांडू यांचे वडील आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघाती निधन झाल्यानंतर पेमा खांडू प्रकाशझोतात आले.

वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये खांडू यांचा विजय झाला. काँग्रेसचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या सरकारमध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Pema Khandu
Raveena Tandon : 'रवीनाने मारहाण केली नाही' पोलिसांचा खुलासा, तक्रार करणाऱ्या कुटूंबाची केली पोलखोल

२०१६ अरुणाचल प्रदेशात घटनात्मक पेचप्रसंगामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाली. राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणाऱ्या कालिकोह पुल यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तुकी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद आलं, परंतु तुकी यांना अल्पकाळातच राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पेमा खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं.

पेमा खांडू यांनी दोनदा पक्षांतर केलं. पहिल्यांदा काँग्रेसमधून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षात आणि त्यानंतर लवचिक धोरण स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश केला.

२०१९ मुक्तो या विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. २०२४ मुक्तो येथून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com