Who is Praveen Sood new Cbi director praveen sood Vs dk shivakumar Congress on CBI Director
Who is Praveen Sood new Cbi director praveen sood Vs dk shivakumar Congress on CBI Director

Praveen Sood : भाजपनं डाव साधला! कर्नाटकात डीके शिवकुमारांना नडलेल्या डीजीपींना बनवलं CBI डायरेक्टर

कर्नाटक विधानसभा निवडणुक 2023 मध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. या निकालानंतर सगळीकडे काँग्रेस पक्षाची सर्वाधिक चर्चा होत आहे. यासोबतच आणखी एक नाव सध्या चर्चेचा विषय बनले आहे. ते नाव आहे प्रवीण सूद यांचं.

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर केंद्र सरकारने रविवारी (14 मे) त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी शनिवारी (13 मे) सायंकाळी उच्चस्तरीय बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यावेळी उपस्थित होते . या बैठकीत सीबीआयच्या नवीन संचालकाची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली आणि नंतर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Who is Praveen Sood new Cbi director praveen sood Vs dk shivakumar Congress on CBI Director
Raj Thackeray On BJP : "छोटी माणसं, यांचं अस्तित्व मोदींमुळे टिकून"; राज ठाकरेंचा भाजप नेत्यावर प्रहार

डीके शिवकुमार हे सूद यांना 'नालायक' म्हणाले होते

कर्नाटकात काँग्रेसचा विजयाचे श्रेय ज्या नेत्याला दिलं जात आहे, त्या डीके शिवकुमार यांनी प्रवीण सूद यांच्यावर जोरदार टीका केली होती. डीके शिवकुमार तर त्यांना 'नानायक' देखील म्हणाले होते. शिवकुमार म्हणाले होते की आमचे डीजीपी हे त्यांच्या पदासाठी योग्य नाहीत. ते तीन वर्षे डीजीपी आहेत, पण भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करतात. त्याच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा.

शिवकुमार यांनी आरोप केला होता की, सूद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर 25 गुन्हे दाखल , मात्र भाजप नेत्यांवर एकही गुन्हा दाखल केला नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. तसेच प्रवीण सूद यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती. निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यास सूद यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शिवकुमार म्हणाले होते.

Who is Praveen Sood new Cbi director praveen sood Vs dk shivakumar Congress on CBI Director
Maharashtra News : राज्यातून मुली-महिला बेपत्ता! आंतरराष्ट्रीय कट असल्याची शंका; चाकणकर म्हणाल्या…

सूद यांची कारकिर्द

1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण सूद हे दोन वर्षांसाठी हे पद सांभाळणार आहेत. ते मे 2024 मध्ये निवृत्त होणार होते, परंतु या नियुक्तीनंतर त्यांचा कार्यकाळ मे 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते 25 मे रोजी सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची जागा घेतील. या पदासाठी प्रवीण सूद, मध्य प्रदेशचे डीजीपी सुधीर कुमार सक्सेना यांच्याशिवाय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे डीजी ताज हसन यांच्या नावांचाही समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com