ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे ऋषी सुनक आहेत तरी कोण?

ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे.
who is rishi sunak could be next prime minister of britain boris johnson
who is rishi sunak could be next prime minister of britain boris johnson esakal

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत आलं आहे. ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. (who is rishi sunak could be next prime minister of britain boris johnson)

who is rishi sunak could be next prime minister of britain boris johnson
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

बोरिस जॉन्सन सरकारमधील विद्यमान मंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी नाधिम झहावी यांची ब्रिटनचे नवीन अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला.

अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.

तसेच सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा रिचमंड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून आले होते. सुनक २०१७ मध्ये पुन्हा निवडून आले होते. सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्तीशी झाले आहे.

कोण आहेत ऋषी सुनक?

ऋषी सुनक हे ब्रिटनचे रहिवासी आहेत. सध्या ते ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते ब्रिटनमधील रहिवासी असले तरीही त्यांची पाळंमुळं मात्र भारताशी जोडली गेली आहेत.

सध्याच्या घडीला सुनक यांच्या कामानं अनेकजण प्रभावित असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांना पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे.

who is rishi sunak could be next prime minister of britain boris johnson
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव यूकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत

ऋषी सुनक यांचा जन्म...

ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.

त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.

राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.

नारायण मूर्ती यांचे जावई

भारतीय सॉफ्टवेयर कंपनी इंफोसिस (Infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे ऋषी सुनक यांचे सासरे आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी, अक्षता ही ऋषी यांची पत्नी आहे.

ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. 2009 मध्ये ऋषी यांचा विवाह अक्षताशी झाला होता. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com