

29 Year Old S Keerthana Becomes Minister in Tamil Nadu
Esakal
29 Year Old S Keerthana Becomes Minister in Tamil Nadu तामिळनाडुत अभिनेता विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या विजय यांच्या मंत्रिमंडळात एकूण ९ मंत्री आहेत. यात एस कीर्तना या एकमेव महिलेचा समावेश आहे. फक्त २९ वर्षांच्या असलेल्या कीर्तना यांना हिंदीसह पाच भाषा बोलता येतात. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या की, हे खूपच अविश्वसनिय आहे, इतर कोणत्याही राज्यात अशा प्रकारे मंत्रिपद मिळालेलं नाही. मलाही याआधी अशी संधी मिळाली नाहीय. आता आम्ही जगाला दाखवू की सरकार कसं चालवलं जातं.