
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे 51 वे मुख्य न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. 11 नोव्हेंबर 2024 रोजी ते शपथ घेणार आहेत, ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय सुरू होणार आहे. दिल्लीचे रहिवासी असलेले खन्ना हे अनेक महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय घेणाऱ्या न्यायमूर्तींपैकी एक आहेत. त्यांनी कलम 370 ते अरविंद कजरेवाल यांना जामीन प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.