esakal | कोरोनाचा भारतीय व्हेरियंट अनेक देशांत पसरतोय; WHO चा दावा

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाचा भारतीय व्हेरियंट अनेक देशांत पसरतोय; WHO चा दावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाचा भारतीय व्हेरियंट जगातील इतर देशांमध्येही पसरत असल्याचा दावा जागतीक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे. आजवर १७ देशांमध्ये कोरोनाचं हे भारतीय रुप आढळून आल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाचे ५७ लाख प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये हा भारतीय प्रकार आढळून आल्याचं WHO नं म्हटलं आहे.

हेही वाचा: मैत्रीला सलाम! मित्रासाठी केला १३०० किमीचा प्रवास; २४ तासांत आणला ऑक्सिजन सिलिंडर

WHOने मंगळवारी आपल्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये सांगितलं की, "SARS Cov-2 चा (कोविड-१९) B-1.617 हा प्रकार भारतात कोरोनाचं संक्रमण वाढण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. WHOच्या बुलेटिनप्रमाणं २७ एप्रिलपर्यंत GISAID मध्ये सुमारे १२०० सिक्वेन्स अपलोड करण्यात आले यामध्ये कोरोनाची वंशावळ असलेला B-1.617 विषाणू कमीत कमी १७ देशांमध्ये आढळल्याचं सांगण्यात आलं. GISAID ची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली होती. हे एक प्रकारचं रजिस्टर असून यामध्ये इन्फ्लुएन्जा विषाणू आणि कोविड-१९ जागतीक महामारीसाठी जबाबदार असलेल्या कोरोना विषाणूंचा जीनोम डेटा सर्वांना खुला उपलब्ध असतो.

कोरोनाचा भारतीय प्रकार जास्त संक्रामक

WHO च्या अहवालात म्हटलंय की, B-1.617 हा प्रकार भारतातील इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक वेगानं विकसित होत असून जो जास्त संक्रमणकारी आहे. त्याचबरोबर सध्या कोरोनाचे जे नवे व्हेरियंट आढळून येत आहेत ते देखील जास्त संक्रमणकारी आहेत.