देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झालेला शेरजिल आहे तरी कोण?

वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

देशविरोधी आणि प्रक्षोभक भाषण देणाऱ्या देशद्रोही शेरजिल इमामला मंगळवारी बिहारच्या जेहानाबाद येथे पकडले. आसाम राज्याला भारतापासून वेगळे करण्याचे आवाहन करणारा शेरजिल इमाम हा जेएनयूमध्ये आधुनिक इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. तो अनेक संकेतस्थळांवर कॉलमही लिहितो.

पुणे : देशविरोधी आणि प्रक्षोभक भाषण देणाऱ्या देशद्रोही शेरजिल इमामला मंगळवारी बिहारच्या जेहानाबाद येथे पकडले. आसाम राज्याला भारतापासून वेगळे करण्याचे आवाहन करणारा शेरजिल इमाम हा जेएनयूमध्ये आधुनिक इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. तो अनेक संकेतस्थळांवर कॉलमही लिहितो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूमध्ये पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या शेरजिल इमामने युरोपमधील नोकरी सोडली आणि भारतात परतला. जेएनयूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो कट्टरपंथी होऊ लागला आणि पाच वेळेस नमाजपठण करणारा तरुण बनला. त्याच्या लिखाणात आणि विचारात कट्टरता आहे.

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेएनयूच्या शर्जील इमामला अटक

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढल्यानंतर त्याच्या भूमिकेने तो चर्चेत आला. शाहीनबागच्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड मानला जातो. मॉब लिंचिंगच्या घटनांना हवा देण्याचे कामही त्याने केले आहे. त्यामुळेच शेरजीलच्या फेसबुक वॉलवर पोलिसांची नजर होती. फेसबुक पेजवरील माहितीनुसार, पाटण्यातील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने दिल्लीच्या वसंतकुंज येथे दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तो आयआयटी बॉम्बेत गेला. तेथे पदवी घेतल्यानंतर युरोपला गेला आणि तेथे आयटी यूनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन येथे प्रोग्रॅमर पदावर काम केले. याशिवाय आयआयटी बॉम्बेतही सहायक शिक्षक म्हणूनही त्याने योगदान दिले आहे. शेरजील इमामने फेसबुक वॉलवर शाहीनबागच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर देशभरात आंदोलन सुरू झाले.

शेरजीलच्या कुटुंबाची राजकीय पार्श्‍वभूमी
शेरजीलचे कुटुंब राजकारणात सक्रिय राहिले आहे. चार वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. ते माजी खासदार अरुण कुमार यांचे निकटवर्ती मानले जायचे. अरुण कुमार समता पक्षात असताना शेरजीलचे वडील त्यांच्यासोबत असायचे. अरुण कुमारबरोबर ते जेडीयूमध्ये आले. शेरजीलचा लहान भाऊ हा अरुण कुमार यांचा पक्ष राष्ट्रीय लोक समता पक्षाचा (सेक्‍युलर) सदस्य असल्याचे सांगितले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is Shergill imam arrested under the Crime of sedition