Who is Danish the Pakistani officer linked to Jyoti Malhotra? : प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारताची संवेदनशील माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. शनिवारी हिसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.