
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारावेळी त्यांचं निधन झालं. एकेकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं होतं. याशिवाय चार राज्यांचं राज्यपालपदही भूषवलं होतं. मात्र गेल्या काही वर्षात भाजपसोबत त्यांचं बिनसलं होतं. त्यांनी पुलवामा हल्ला प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.