
MP Shafiqur Rahman Barq Passed Away: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संभलचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे आज (मंगळवारी) निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. शफीकुर्रहमान बर्क हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच सपा प्रमुख अखिलेश यादवही त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने त्यांना संभळमधून उमेदवारी दिली होती.
शफीकुर्रहमान बर्क हे लोकसभेतील सर्वात वयस्कर खासदार होते. शफीकुर्रहमान बर्क चार वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिले आहेत. 1996 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्याचवेळी 2014 च्या मोदी लाटेत त्यांनी बसपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली आणि जिंकली.
आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेले शफीकुर्रहमान बर्क हे नेहमीच मुस्लिमांच्या हितासाठी बोलायचे. शफीकुर्रहमान बर्क यांचा मुलगाही समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार आहे. सपा खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या निधनाबद्दल मुरादाबादचे खासदार डॉ. एसटी हसन म्हणाले, ही अत्यंत दुःखद घटना आहे. मला नुकतेच कळले की, श्रीमान शफीकुर्रहमान बर्क साहेब आता आपल्यात नाहीत.
त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांचे व पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. देशाचा एक महान नेता या जगातून निघून गेला. ज्याने कधीही कोणाच्या भीतीने काम केले नाही. कदाचित असे धाडसी आणि प्रामाणिक नेते संपूर्ण देशात फार कमी आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला प्रकृती खालावल्याने त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बर्क यांच्या निधनामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
शफीकुर्रहमान बर्क यांचा जन्म 11 जुलै 1930 रोजी उत्तर प्रदेशातील संभल येथे झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. 1996 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्याचवेळी त्यांनी 2014 मध्ये बसपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती.
पीएम मोदींनीही बर्क यांचं केलं होतं कौतुक
पंतप्रधान मोदींनीही एकदा शफीकुर्रहमान बर्क यांचे कौतुक केले होते. 2023 मध्ये नवीन लोकसभेतील भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्क यांच्या सभागृहातील निष्ठेबद्दल त्यांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की 93 वर्षांचे असूनही डॉ. शफीकुर्रहमान बर्क या सभागृहात बसले आहेत. सदनाप्रती अशीच निष्ठा असायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.