esakal | कर्नाटक राज्याचा कोण होणार मुख्यमंत्री? 'या' पाच दिग्गज नेत्यांत रस्सीखेच!
sakal

बोलून बातमी शोधा

 Yediyurappa

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या वेगाला जोर आला आहे. येडियुराप्पा यांच्यानंतर कोण? या चर्चेला आता उधाण आले आहे. केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, बोम्मरबेट्टू संतोष, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.

कर्नाटक राज्याचा कोण होणार मुख्यमंत्री?

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बंगळूर : कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या वेगाला जोर आला आहे. येडियुराप्पा यांच्यानंतर कोण? या चर्चेला आता उधाण आले आहे. केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Venkatesh Joshi), डॉ. सी. एन. अश्वथनारायण (Dr. C. N. Ashwathnarayan), बोम्मरबेट्टू संतोष (Bommarabettu Laxmijanardhana Santhosh), उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. भाजपच्या विधिमंडळ समितीची लवकरच बैठक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे येडियुरप्पा हे लवकरच गाशा गुंडाळणार असल्याच्या चर्चेला उत आला आहे. (Who Will Be The Next Chief Minister Of Karnataka After Yediyurappa Political Karnataka bam92)

माहितीनुसार, येडियुरप्पा यांची भाजपच्या आमदारांसाठी भोजन आणि त्यानंतर विधानसभेत फोटोसेशन आयोजित करण्याची इच्छा आहे, तसेच 23 आणि 24 जुलैला ते शिवमोगा या त्यांच्या जिल्ह्याला भेट देऊ शकतात. 26 तारखेला पक्षाच्या विधिमंडळ समितीची बैठक आहे. मात्र, त्यापूर्वी 25 जुलैला ते वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोजनासाठी आमंत्रित करू शकतात. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय सूत्रांनुसार पवित्र आषाढ महिना असल्याने 15 ऑगस्टपर्यंत कोणतीही घोषणा करण्याचे येडियुरप्पा यांना टाळायचे आहे, तसेच येडियुरप्पा यांना बदलण्यात येणार असल्याची शक्यताही निकटवर्तीयांनी फेटाळली आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत असलेल्या कर्नाटकच्या तीन नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे संकेत आहेत. कर्नाटकमध्ये काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून पक्ष नेतृत्वाची भेट घेतली होती. एकीकडे राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना काँग्रेसमधून अनपेक्षितरीत्या पाठिंबा मिळत आहे. भाजपने येडियुरप्पा यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. अन्यथा पक्षाला लिंगायत समुदायाचा रोष सहन करावा लागेल, असे वक्तव्य माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी केले. त्यांच्यासोबतच आमदार शामानूर शिवशंकराप्पा यांनीही अशीच भूमिका मांडलीय.

येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते. पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांनी केला होता. ते म्हणाले होते, की मी पंतप्रधानांना विकासकामांबाबत भेटलो, त्यामुळे राजीनाम्याच्या बातम्यांना अजिबात महत्व नाही.

हेही वाचा: कर्नाटकात नवा मुख्यमंत्री 28 जुलैला?

'या' पाच नेत्यांतील कोण होणार मुख्यमंत्री?

कर्नाटक राज्यातील प्रल्हाद वेंकटेश जोशी (Pralhad Venkatesh Joshi) हे सध्या केंद्रात संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्यरत आहेत. 2004 पासून ते धारवाड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून 2014 ते 2016 पर्यंत ते भारतीय जनता पार्टी, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदीही (2014-2018) काम केले आहे. 30 मे 2019 रोजी प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या टर्म सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आहेत.

Pralhad Venkatesh Joshi

Pralhad Venkatesh Joshi

डॉ. सी. एन. अश्वथनारायण (Dr. C. N. Ashwathnarayan) हे सध्या कर्नाटक राज्याचे 8 वे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून सध्याच्या येडियुरप्पा मंत्रालयात त्यांच्याकडे विविध खातीही देण्यात आली आहेत. अश्वथनारायण हे मल्लेश्वरम मतदार संघातून (Malleshwaram constituency) भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे कर्नाटक विधानसभेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे संयोजक आणि राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगलोरचे संस्थापक अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. अश्वथनारायण यांनी आरोग्य प्रभाग योजना, विधवा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन योजना कर्नाटकात सुरु केल्या आहेत. 20 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचा भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Ashwathnarayan

Ashwathnarayan

बोम्मरबेट्टू लक्ष्मीजनार्धन संतोष (Bommarabettu Laxmijanardhana Santhosh) हे 15 जुलै 2019 पासून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. संतोष यांनी कर्नाटक राज्य विभागात आठ वर्षे भाजपाचे सरचिटणीस (संघटना) म्हणून काम केले असून अमित शाह यांनी 2014 मध्ये दक्षिणेकडील राज्यांचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांना नियुक्त केले होते. संतोष हे कर्नाटकातील उडूपी येथील असून त्यांचा ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला आहे. कर्नाटकच्या दावणगेरे येथील बीडीटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. संतोष यांनी 1993 मध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही सुरुवात केली होती. 2006 मध्ये त्यांनी कर्नाटकचे सरचिटणीस (संघटना) म्हणून भाजपात काम पाहिले आहे. 2014 मध्ये संतोष यांना भाजपचे सह-सरचिटणीस (संघटना) बनविण्यात आले, तर 2019 मध्ये ते भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

लक्ष्मण संगप्पा सवदी (Laxman Sangappa Savadi) हे कर्नाटकचे 8 वे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. शिवाय ते राज्याचे परिवहन मंत्री म्हणून देखील कार्यरत आहेत. तसेच कर्नाटक विधानपरिषदेचे सभापती उपनेते असून त्यांनी बी. एस. येडियुरप्पा मंत्रालय आणि डी. व्ही. सदानंद गौडा सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. सवदी हे 2004, 2008 आणि 2013 मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून अथणी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. 20 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Laxman Sangappa Savadi

Laxman Sangappa Savadi

मुरुगेश निराणी (Murugesh Nirani) हे येडियुरप्पा सरकारमध्ये खाण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. ते बिलगी, बागलकोट विधानसभेचे आमदार आहेत. त्यांना 24 डिसेंबर 2014 रोजी कर्नाटक शासनाकडून मेक इन इंडिया पुरस्कार देखील मिळाला आहे. शिवाय ते निराणी ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Who Will Be The Next Chief Minister Of Karnataka After Yediyurappa Political Karnataka bam92

loading image