दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कोणाकडे सोपविली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज छाननी समितीचे नेतृत्व राजीव सातव यांच्याकडे सोपविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ७० जागांपैकी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. या वेळी तो फोडण्याचे आव्हान सातव यांना पेलावे लागणार आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज छाननी समितीचे नेतृत्व राजीव सातव यांच्याकडे सोपविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ७० जागांपैकी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. या वेळी तो फोडण्याचे आव्हान सातव यांना पेलावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, केंद्रीय निवडणूक आयोगानेही निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे.

काँग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळाल्या होत्या. तसेच, लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची दिल्लीमध्ये कामगिरी अतिशय सुमार राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल सरकारला आणि दिल्लीत सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने ‘राहुल ब्रिगेड’मधील नेत्यांना पुढे केले आहे.

'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने

उमेदवारनिवडीसाठी काँग्रेसच्या छाननी समितीत राजीव सातव यांच्यासोबत बिहारचे सहप्रभारी असलेले वीरेंद्रसिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी असलेले चल्ला वाम्शीचंद रेड्डी सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To whom did the Congress entrust the responsibility of Delhi Assembly elections