'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने

sambit-patra-and-rahul-gandhi
sambit-patra-and-rahul-gandhi

नवी दिल्ली - आरएसएसचा पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. देशात कोठेही ताबा केंद्र नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. "झूठ झूठ झूठ' या हॅशटॅगसह राहुल यांनी "आरएसएसचा पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलत आहे, असे ट्विट केले आहे. याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओ फितही त्याला जोडली आहे. यात मुस्लिमांना ताबा केंद्रात पाठविले जाणार असल्याच्या अफवा कॉंग्रेस, त्यांचे सहकारी पक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवित असल्याचा आरोप मोदी यांनी केल्याचे दिसत आहे. तसेच यात आसाममधील प्रस्तावित ताबा केंद्राची उभारणी होत असल्याचेही चित्रण आहे.

भाजपचा पलटवार
दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये तोंडी युद्ध सुरू आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आरोप केल्यानंतर भाजपमध्ये संताप व्यक्त होत आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधत "खोट्यांचा सरदार' अशा शब्दांत त्यांच्यावर उलटवार केला आहे. पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणताहेत की आरएसएसचा पंतप्रधान खोटे बोलत आहे. राहुल गांधी यांच्याकडून सभ्य भाषेची अपेक्षा करणे म्हणजे खूप अपेक्षा करणे आहे. राफेल प्रकरणात ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी माफी मागितली होती, त्यावरून त्यांना आम्ही "खोट्यांचा सरदार' म्हणणे ही अतिशयोक्ती होणार नाही. आसाममध्ये ताबा केंद्रे उभारली होती आणि 362 लोकांना त्यात ठेवले होते, हे राहुल गांधी यांच्या सरकारने डिसेंबर 2011 च्या प्रसिद्धिपत्रकात मान्य केले आहे. आता तुम्ही पुन्हा देशाची माफी मागणार का?, असा सवास संबित पात्रा यांनी केला. राहुल गांधी यांना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही आणि ते प्रत्येक विषयात खो घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे लक्ष्य ना "सीसीए' आहे ना "एनपीआर', असेही ते म्हणाले. याआधी राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या आयटी कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही कॉंग्रेसला उत्तर दिले.

पत्रसूचना कार्यालयाला एका प्रसिद्धिपत्रकाचा स्क्रिनशॉट ट्‌विट केला आहे. "362 अवैध प्रवाशांना आसामच्या ताबा केंद्रात पाठविण्यात आले आहे,' असे शीर्षक त्याला दिले आहे. कॉंग्रेसने हे प्रसिद्धीपत्रक 2011 मध्ये जाहीर केले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ""भारताने सातत्याने तुम्हाला धुडकावले आहे, म्हणून तुम्ही तिरस्कार आणि दहशतीचे राजकारण करीत देशाला तोडू पाहत आहात का?, असा प्रश्‍न मालवीय यांनी केला आहे. 

'भाजप कारस्थान रचत आहे' 
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी सरकार "राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही'(एनपीआर)च्या आडून राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) राबविण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला. "एनपीआर'ला "एनआरसी'ला जोडण्यापासून सरकार मागे हटले नाही तर कॉंग्रेस त्याचा ताकदीने विरोध करेल. "यूपीए' सरकारने केवळ "एनपीआर'साठी पुढाकार घेतला होता आणि त्याला "एनआरसी'शी कधीही जोडले नव्हते. एनपीआर'ला "एनआरसी'मध्ये फरक करण्याची गरज आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जो व्हिडिओ भाजपने प्रसारित केला आहे, त्यात सामान्य रहिवासाचा उल्लेख केला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप कधीही सामान्य रहिवासाबद्दल बोलला नाही. त्यांनी नेहमीच "एनआरसी'बद्दल चर्चा केली. ते "एनपीआर'वर कधीच बोलत नव्हते. 
अजय माकन, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com