
Southern States Protest: केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार यांच्यामध्ये एक जबरदस्त वाद चालू आहे तो वाद आहे डीलिमिटेशनचा आपल्या महाराष्ट्रात या डी लिमिटेशनची कुठेच चर्चा होताना दिसत नाही पण महाराष्ट्राला सुद्धा या डीलिमिटेशनचा मोठा दणका बसणार आहे या डीलिमिटेशनच्या कायद्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध दक्षिणेकडची राज्य असा संघर्ष आता निर्माण होताना दिसतोय पण हा संघर्ष फक्त दक्षिणतल्या राज्यांचा नाहीये भारतातल्या महाराष्ट्र गुजरात यांच्यासारख्या राज्यांचा देखील हा संघर्ष असणार आहे.
कारण एक प्रकारे दक्षिणेकडील विकसित राज्य विरुद्ध उत्तरेतला अविकसित मागास बिमारी राज्य असा हा संघर्ष होणार आहे. आजच्या या लेखात पाहूया हे नक्की डीलिमिटेशन आहे काय? याचा फटका कुणाकुणाला बसणार आणि महाराष्ट्र याबाबतीत गप्प का आहे?