बालकांच्या मृत्यूबाबत मौन का; मायावती यांची प्रियांकांवर टीका

पीटीआय
Friday, 3 January 2020

मुद्द्याचे राजकारण नको - गेहलोत
बालकांच्या मृत्यूवरून भाजप आणि बसपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बालकांच्या मृत्यूबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. या मुद्द्याचे राजकारण केले जाऊ नये. राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण वेगाने घटत आहे. माता आणि बालकांचे आरोग्य हे राज्याच्या प्राधान्यक्रमावर आहे,’ असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

लखनौ - राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात बालकांच्या झालेल्या मृत्यूबाबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना मौन बाळगल्याबद्दल बसप नेत्या मायावती यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाले असून, प्रियांका यांनी पीडित कुटुंबांची भेट घ्यायला हवी होती, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोटामधील सरकारी रुग्णालयात गेल्या महिनाभरात १०० बालकांचा मृत्यू झाला आहे. ‘लहान मुले इतक्‍या मोठ्या संख्येने दगावणे ही दु:खदायक बाब आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अद्यापही या घटनेकडे असंवेदनशीलतेने बघत आहे. पण, त्याहून दु:खदायक बाब म्हणजे त्यांच्या महिला नेत्याने याबाबत मौन बाळगले आहे. त्यांनी दु:खात असलेल्या बालकांच्या मातांची भेट घेणे आवश्‍यक आहे,’ असे मायावती यांनी ट्विटरवर म्हटले आहे, प्रियांका यांनी या मातांची भेट घेतली नाही, तर त्या आंदोलनातील पीडित कुटुंबांच्या घेत असलेल्या भेटी केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मानण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

लहान बालकांचा मृत्यू ही वेदनादायक घटना आहे. या बालकांच्या मातांचे दु:ख काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना समजू नये, हे अत्यंत दु:खदायक आहे. 
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why the death of a child is silent