
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीचवर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. आंध्र प्रदेश सरकारने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बरीच तयारी केली आहे. रामकृष्ण बीच हे ठिकाणही भव्य पद्धतीने सजवण्यात आले आहे. या शिबिरात पाच लाख लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी ३ लाखांहून अधिक लोकांसोबत येथे योगाभ्यास केला आहे. पंतप्रधान मोदींनी हे ठिकाण का निवडले हा प्रश्न अनेकांना पडला आहे.