esakal | "मनमोहन सिंगांनी मोदींना पत्र लिहिण्याऐवजी महाराष्ट्र सरकारला सल्ला का नाही दिला?"

बोलून बातमी शोधा

fadnvis
"मनमोहन सिंगांनी मोदींना पत्र लिहिण्याऐवजी महाराष्ट्र सरकारला सल्ला का नाही दिला?"
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबई : देशातील कोरोनाच्या उद्रेकावर काँग्रेस नेते सोनिया, राहुल, प्रियंका गांधी त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या. मात्र, सध्या महाराष्ट्राची स्थिती बिकट बनली आहे. इथे काँग्रेस सत्तेत आहे, मग मनमोहन सिंग यांनी अशा सूचना त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला का दिल्या नाहीत, असा सवाल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, देशातील एकून कोरोनाबाधितांपैकी महाराष्ट्रातील ३५ ते ४० टक्के रुग्ण आहे. यांपैकी ३५ ते ३७ टक्के अॅक्टिव्ह केसेस आहेत. पहिल्या लाटेवेळी देखील महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता राज्य सरकार दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तयार का राहिलं नाही? उलट काहीतरी भयानक सुरु असल्याची गोष्ट सांगण्यासाठी काँग्रेस नेते प्रियंका, राहुल, सोनिया गांधी तसेच मनमोहन सिंग यांनी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना पत्र लिहंल पत्रकार परिषदही घेतली. मग त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारला तसा सल्ला का नाही दिला? असा आरोपही फडणवीस यांनी केला.

हेही वाचा: 'सीरम'कडून लशीची किंमत जाहीर; सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगळा दर

यावरुन हे दिसून येतं की, काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला देशात नकारात्मकतेचं वातावरण तयार करायचं आहे. मला प्रियंका गांधीना विचारायला आवडेल की त्यांनी कधी या गोष्टींबाबत महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारसोबत चर्चा केली. सध्या तिथे काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला? महाराष्ट्रात कोविडमुळे ३८ ते ४० टक्के मृत्यू झाले आहेत, याची कधी त्यांनी चौकशी केली? असे अनेक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.