14th Feb Black Day : १४ फेब्रुवारीला इतिहासातील 'काळा दिवस' का म्हटले जाते?

जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आजच्या दिवशी भारताच्या इतिहासात एक काळी घटना घडली होती.
14th Feb Black Day
14th Feb Black Dayesakal

14th Feb Black Day : जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आजच्या दिवशी भारताच्या इतिहासात एक काळी घटना घडली होती. भारतीय शूर जवानांसोबत घडलेली एक दुर्दैवी घटना त्याच्याशी जोडलेली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला होता. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय जवानांवर पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले होते.

आजच्या दिवशी जम्मू-काश्मिरमधील एका दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करून सीआरपीएफच्या वाहनाला जोरदार धडक दिली होती. हा स्फोट एवढा भीषण होता की, या स्फोटात ४० जवान शहिद झाले. आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? ते आपण जाणून घेऊयात.

इतिहासातील काळा दिवस

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये सीआरपीएफचा एक ताफा जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. यावेळी भारतीय लष्कराचे जवान बसमधून प्रवास करत होते. त्यांची बस पुलवामामध्ये पोहचल्यावर दुसऱ्या बाजूने स्फोटकांनी भरलेली एक कार आली.

ही कार जवानांच्या बसला जोरात धडकली. या धडकेमध्ये मोठा स्फोट झाला. ज्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहिद झाले. या भीषण हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

भारताने दिले चोख प्रत्युत्तर

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या ४० जवानांना त्यांचे प्राण गमावावे लागले होते. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना आव्हान देत या घटनेचा बदला घेतला जाईल, असे म्हटले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. २५ फेब्रुवारीला भारताच्या मिराज-२००० विमानाने मध्यरात्री ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले. त्यानंतर, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

14th Feb Black Day
Pulwama Attack Special Story ; हमे याद है उनकी कुर्बानी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com