लोकसभेत ४२० क्रमांकाचे आसन का नाकारले जाते?

loksabha
loksabhagoogle

नागपूर : तुमचा लकी नंबर काय? असा प्रश्न तुम्हालाही कोणी विचारला असेल. तेव्हा आपण आपला आवडता क्रमांक किंवा आपल्याला लकी असणारा क्रमांक सांगत असतो. लकी क्रमांकासाठी आपण नेहमी धडपड करत असतो. अशीच धडपड लोकसभेत (loksabha) झालेली तुम्ही ऐकलंय का? होय, आपल्या देशाच्या लोकसभेत ४२० क्रमांकाच्या आसन नको (why nobody gets 420 seat in loksabha) म्हणून एका खासदारांनी (MP) दुसरा आसन क्रमांक मिळविला होता. पण, त्यांना हे ४२० क्रमांकाचे आसन का नको होते? याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत. (why nobody gets seat number 420 in our loksabha)

loksabha
जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज नकोत; CBI च्या कर्मचाऱ्यांना आदेश

लोकसभेत ४२० क्रमाकांचे आसन का नाकारले जाते? -

फसवणूक करणाऱ्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार ४२० कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच कोणी कुठली फसवणूक केली असेल तर त्याला 'ओये ४२०' अशी हाक मारलेली तुम्ही अनेकदा ऐकली असेल. त्यामुळे ४२० हा क्रमांक आपल्याकडे चांगला समजला जात नाही. इतकेच नाहीतर हा क्रमांक आपल्या लोकसभेत देखील अनेक खासदारांना नको असतो. त्यांच्या सोयीसाठी हा क्रमांक बदलून देण्याची यंत्रणा देखील आपल्याकडे आहे. कारण संसदेतील सदस्य हे फक्त आपल्या प्रतिष्ठेलाच महत्व देत नाहीत, तर आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून त्या प्रतिमेला जपण्याचा देखील प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या आसन क्रमांकावरून संसदेत त्यांच्यावर चिखलफेक होण्याची भीती असते. काही वेळा हा मुद्दा फार ताणला जाऊ शकतो. तसेच आपण या आसन क्रमांकावर बसलो तर विरोधक त्याचा गैरफायदा घेतील, अशी भीतीही अनेक खासदारांना असते. त्यामुळेच ४२० क्रमांकाचे आसन नाकारले जाते.

आसन क्रमांक ४२० ला पर्याय काय? -

कुठलेही खासदार ४२० क्रमांकाचे आसन स्वीकारण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यासाठी आपल्या लोकसभेत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या खासदारांनी हे आसन नाकारले त्यांनी ४२० ऐवजी '४१९-अ' क्रमांकाचे आसन दिले जाते. हे आसन त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.

माजी खासदार मौलाना  बदद्रुीन अजमल
माजी खासदार मौलाना बदद्रुीन अजमलgoogle

कोणी नाकारले होते ४२० क्रमांकाचे आसन? -

२००९ साली झालेल्या १५ व्या लोकसभेमध्ये आसाम येथील धुब्री लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मौलाना बदद्रुीन अजमल यांना ४२० क्रमाकांचे आसन देण्यात आले होते. आपल्याला या क्रमाकांचे आसन मिळाले हे माहिती होताच त्यांना धक्का बसला. भारतीय दंड संहितेतील फसवणुकीसाठी असलेले हे कलम आहे. त्यामुळे आपल्याला हे आसन का दिले? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी लगेच लोकसभा सचिवांकडे आसन क्रमांक बदलण्याबाबत चौकशी केली. मला कुठलाही क्रमांक चालेल पण ४२० नको, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच १३ क्रमांकाला देखील अनलकी समजले जाते. तो क्रमांक सुद्धा स्वीकारण्यास अजमल तयार होते. त्यामुळे दुसरा आसन क्रमांक देण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना '४१९-अ' असा आसन क्रमांक देण्यात आले.

अजमल यांच्यापूर्वीही एका खासदारने नाकारले होते ४२० क्रमांकाचे आसन -

अजमल ४२० क्रमांक नाकारणारे पहिले खासदार नव्हते. १४ व्या लोकसभेमध्ये देखील एका खासदाराने या क्रमाकांचे आसन नाकारले होते. त्यानंतर संबंधित खासदारांच्या विनंतीनुसार त्यांना '४१९-अ' हे आसन तयार करण्यात आले होते. ज्यावेळी अजमल यांनी देखील आसन नाकारले त्यांनाही '४१९-अ' हे आसन दिले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com