esakal |  का म्हणलं जात होतं रघुवंश प्रसाद सिंह यांना मनरेगा मॅन ? जाणून घ्या सिंह यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

raghuvansh prasad sinh

 रघुवंश प्रसाद सिंह हे 1977 पासून राजकारणात सक्रिय होते. ते लालू प्रसाद यांच्या एकदम निकटचे मानले जात होते. त्यांना पक्षातील दुसरा लालू मानलं जात असे. लोकसभेत विरोधात असताना ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला घेराव घालण्यात आघाडीवर असायचे.

 का म्हणलं जात होतं रघुवंश प्रसाद सिंह यांना मनरेगा मॅन ? जाणून घ्या सिंह यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज  (रविवार) निधन झालं आहे. सिंह हे 14 व्या लोकसभेचे सदस्य तसेच युपीएकाळात ( United Progressive Alliance) केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं.  युपीएच्या मंत्रीमंडळात राष्ट्रीय जनता दलाचे प्रतिनिधित्व केलं होतं. रघुवंश प्रसाद सिंह  हे बिहारमधील वैशाली लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले होते. सिंह यांची काही दिवसांपुर्वीच तब्येत ढासळल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अखेर रविवारी  रघुवंश प्रसाद सिंह यांचं दुखःद निधन झालं आहे.

मागील चार दशकांपासून विधिमंडळातील लोकप्रतिनिधी म्हणून रघुवंश प्रसाद सिंह भारतातील ज्येष्ठ राजकारण्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कर्पुरी ठाकूर मंत्रिमंडळात बिहारचे ऊर्जामंत्री केली होती. त्यांनी बिहार विधानसभेमध्ये पाच वेळा बेलसंड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 

देश विदेशातील इतर बातम्या वाचा... क्लिक करा

1991 मध्ये रघुवंश प्रसाद सिंह बिहार विधानपरिषदेत गेल्यानंतर काही काळातच त्यांची बिहार विधानपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. नंतर सिंह हे लोकसभेमध्ये सलग पाच वेळा वैशाली मतदार संघातून निवडून गेले होते. याकाळात त्यांनी तीन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. मनमोहनसिंग सरकारच्या यूपीए -1 काळात सिंह यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून उत्तम काम केलं होतं. आज भारत सरकारची गरिबांसाठी असणार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (Mahatma Gandhi Employment Guarantee Act 2005,) संकल्पना मांडून त्याच्या योग्य अंमलबजावणीचे श्रेय सिंह यांना जातं. यामुळे त्यांना मनरेगा मॅन म्हणूनही म्हटलं जातं.

तीन दिवसांपूर्वी आरजेडीचा राजीनामा-
 तीन दिवसांपूर्वी त्यांनी एम्समध्ये उपचार घेत असताना लालू यादव यांना पत्र लिहून राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा दिला होता. या पत्रास उत्तर म्हणून पाठवलेल्या पत्रात लालू प्रसाद यादव यांनी लिहिलं होतं की , तुम्ही लिहलेलं एक पत्र माध्यमात पसरत आहे. माझा यावर विश्वास नाही. मी आणि माझ्या कुटुंबासमवेत आरजेडी कुटुंबालासुद्धा तुम्हाला निरोगी पहायचे आहे. मागील चार दशकांपासून आपण प्रत्येक राजकीय, सामाजिक आणि अगदी कुटुंबाचाही एकत्र विचार केला आहे.  तुम्ही लवकरच स्वस्थ व्हाल त्यानंतर आपण बोलू. तुम्ही कुठंही जाणार नाहीयेत.  तुमचा, लालू प्रसाद. ' अशा प्रकारचं भावनिक प्रत्यूत्तर लालू प्रसाद यादव यांनी दिलं होतं.

फेक फोटो शेअर करणं पडलं या नेत्याला महागात...

 रघुवंश प्रसाद सिंह हे 1977 पासून राजकारणात सक्रिय होते. ते लालू प्रसाद यांच्या एकदम निकटचे मानले जात होते. त्यांना पक्षातील दुसरा लालू मानलं जात असे. लोकसभेत विरोधात असताना ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला घेराव घालण्यात आघाडीवर असायचे.