RIP : तुम्हीपण श्रद्धांजली देताना ही चूक करता का? वाचा नेमका गोंधळ कुठे होतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RIP

RIP : तुम्हीपण श्रद्धांजली देताना ही चूक करता का? वाचा नेमका गोंधळ कुठे होतो

RIP : एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी RIP असे लिहिणारे अनेकजण हा शब्द लिहिलेला वाचला असेल किंवा तुम्हीदेखील लिहिला असेल.

हेही वाचा: PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा

पण, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर का RIP असे म्हटले जाते. RIP हा एक श्रद्धांजली देण्याचा एक शॉर्टफॉर्म आहे, पण आजकाल लोक तो शब्द म्हणून वापरायला लागले आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांना याचा अर्थदेखील माहिती नाहीये. जर तुम्हालाही त्याचा खरा अर्थ माहित नसेल तर, आज आम्ही तुम्हाला RIP या शब्दाचा खरा अर्थ सांगणार आहोत.

हेही वाचा: LPG Booking Offers : LPG बुकिंगवर मिळतोय 20 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक

असा आहे RIP चा अर्थ

कदाचित काही लोकांना याचा अर्थ माहित असेल, परंतु बहुतेक लोकांना या शब्दाचा अर्थ माहित नाहीये. एखाद्याचे निधन झाल्यानंतर अनेकजण RIP ऐवजी Rip असे लिहितात. मात्र, Rip म्हणजे कापणे असा होतो. त्यामुळे श्रद्धांजली व्यक्त करण्याऐवजी लोक कापणे असे लिहितात. त्यामुळे हा शब्द लिहिण्याची योग्य पद्धती कोणती आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घ्या.

कुठून आला RIP शब्द

RIP हे एक Acronym आहे, ज्याचा संपूर्ण अर्थ 'रेस्ट इन पीस' असा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शब्द नेमका आला कुठून? तर, रेस्ट इन पीस हा शब्द लॅटिन शब्द Requiescat In Pace पासून आला आहे. Requiescat In Pace म्हणजे शांत झोप असा होतो. हिंदीमध्ये याचा अर्थ आत्म्याला शांती मिळो याच्याशी निगडीत आहे. मृत्यूनंतर आत्मा आणि शरीर वेगळे होतात आणि जजमेंट डे ला दोघे पुन्हा एकत्र येतात असे ख्रिश्चन धर्मात मानले जाते.

हेही वाचा: Bathroom Ideas : बाथरूममध्येच का येतात जास्त क्रिएटिव्ह आयडिया? शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

कधी झाली सुरूवात

18 व्या शतकात असे मानले जात होते की, जर एखादी व्यक्तीचे चर्चच्या शांततेत निधन झाले तर, त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताशी एकरूप होतो. अशा वेळी Requiescat In Pace हा शब्द वापरला जातो. RIP या शब्दाचा वापर 18 व्या शतकापासून केला जातो असे मानले जाते. कारण, Requiescat In Pace हे शब्द 5 व्या शतकात मरण पावल्यानंतर अनेक लोकांच्या कबरीवर लिहिलेले आढळून आले आहे. प्रथम या शब्दाचा प्रसार ख्रिस्ती धर्मात वाढला आणि नंतर हा शब्द जागतिक झाला. त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर, श्रद्धांजली वाहण्यासाठी RIP या शब्दाचा उपयोग करतात.

टॅग्स :death