Knowledge: विमानात मोबाईल का फ्लाईट मोडवर ठेवायचा? वाचा खरं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knowledge Facts

Knowledge: विमानात मोबाईल का फ्लाईट मोडवर ठेवायचा? वाचा खरं कारण

Explore Knowledge: विमानात बसल्यानंतर उड्डान करण्यापूर्वी प्रवाशांना त्यांचे मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्याच्या सुचना दिल्या जातात. सीटबेल्ट व्यवस्थित बांधण्यापासून ते खिडकीचा काच वर करण्यापर्यंच्या सगळ्या सूचनांचा यात समावेश असतो. या आवश्यक सूचना प्रत्येक प्रवाशांकडून पाळल्या जातात. मात्र प्रवाशांना त्यांचे मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्यास सांगण्यामागे काय लॉजिक आहे हे तुम्हाला माहितीये का?

अनेक प्रवाशांना तर मोबाईल फ्लाईट मोडवर का करायला सांगतात असाही प्रश्न पडत असेल. चला तर यामागचं योग्य कारण जाणून घेऊया. विमान वाहतुकीदरम्यान विमानचालक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषण हे रेडिओ फ्रिक्वेंसीद्वारे होत असते. आजकाल डिजीटल तंत्रज्ञान हे जुन्या अॅलालॉग तंत्रज्ञानापेक्षा अॅडवांस झाले आहे.

हेही वाचा: विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास Flight Attendant काय करतात?

आपण वापरत असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं एरोप्लेन रेडिएशन आणि नेव्हिगेशन प्रणाली सारखेच फ्रिक्वेंसी सिग्नल्स सोडतात. या इलेक्ट्रॉनिक तरंगांमुळे नियंत्रण कक्षाशी होणाऱ्या संभाषणात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विमानात इलेक्ट्रॉनिक डिवायसेस वापरण्यास मनाई करण्यात येते.

हेही वाचा: Indigo Flight : मुलीने केला बॉयफ्रेंडला मॅसेज, बॉम्बस्फोटाच्या भितीने फ्लाइट सहा तास लेट

अलीकडे 5G तंत्रज्ञानाची सगळीकडे चर्चा आहे. येत्या १ ऑक्टोबरला 5G ची लाँचिंग देखील आहे. मात्र हे नेटवर्क विमान उद्योगातील अनेकांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. कारण 5G नेटवर्कचा बँडविथ स्पेक्ट्रमच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे विमान लँडिंग करताना विमानतळाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.