Indigo Flight : मुलीने केला बॉयफ्रेंडला मॅसेज, बॉम्बस्फोटाच्या भितीने फ्लाइट सहा तास लेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indigo Flight

Indigo Flight : मुलीने केला बॉयफ्रेंडला मॅसेज, बॉम्बस्फोटाच्या भितीने फ्लाइट सहा तास लेट

कर्नीटकमधल्या मंगलूरूमध्ये एक शॉकिंग घटना समोर आली. एका मुलीने बॉयफ्रेंडला केलेल्या मॅसेजमुळे मुंबईला जाणारी Indigo फ्लाइट ६ तास लेट झाली. एवढेच नाही तर फ्लाइटमधून सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर फ्लाइटमध्ये विस्फोटक तर नाही हे तपासण्यासाठी सर्व फ्लाइटचे चेकिंग करण्यात आले.

काय आहे पूर्ण प्रकरण

घटना रविवार १४ ऑगस्टची आहे. एका प्रवाशाने शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या चॅटमध्ये संशयास्पद मॅसेज बघितला. तो कोणत्या तरी मुलीशी चॅट करत होता. त्यानंतर शेजारचा माणूस तक्रार करायला क्रू मेंबरकडे पोहचला. मुलगा मंगलुरूवरून मुंबईला जात होता. तर मुलगीला बेंगलुरूला जायचे होते. दोघे मित्र होते आणि सेक्यूरीटी विषयी त्यांच्यात चेष्टामस्करी चालू होती. यावेळी १४ बी सिटवर बसलेल्या माणसाने पाहिले की, सीट १३ ए वर बसलेल्या मुलाच्या फोनवर 'You are Bomber' असा मॅसेज आला. त्या नंतर त्या माणसाने क्रू मेंबर्सला याविषयी माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण व्हॉट्सॲपवर चॅट करत होते. तेव्हा एका व्यक्तीने ते वाचले. त्या नंतर फ्लाइटमध्ये एकच गोंधळ झाला. फ्लाइट टेक ऑफ होऊ दिली नाही. पोलिसांनी याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. त्या मुलाला व त्याच्या मैत्रिणीला तपासासाठी थांबवून घेण्यात आले. त्यांना प्रवास करू दिला नाही. तर सर्व १८५ प्रवाशांच्या सामालाचे चेकिंग करण्यात आले. त्या नंतर संध्याकाळी ५ वाजता विमान मुंबईला निघाले.