
हनीमूनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. १७ दिवसांनी सोनम रघुवंशी सापडली असून तिला राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलीय. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी तिने मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. राजा रघुवंशीचा मृतदेह २ जून रोजी सापडला. त्यानंतर आठवड्याभराने मध्यरात्री एक वाजता सोनमने पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण केलं. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये तिला एका ढाब्यावरून अटक करण्यात आलीय.