Crime Viral News: बॉयफ्रेंडसाठी पत्नीने करोडपती नवऱ्यासह ५ वर्षांच्या मुलाला संपवलं, घरातले CCTV बंद करून रचला कट; दोघांना अटक

Millionaire Husband and 5 Year Old Son Killed पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीसह मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक करण्यात आलीय. पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
Millionaire Husband and 5 Year Old Son Killed

Wife Boyfriend killed Husband and 5 year Old Son crime news

Esakal

Updated on

चक्कबाणावार येथील गुड्डे बसवपूर परिसरात पाच वर्षांच्या मुलासह पतीची हत्या केल्या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. अभिनंदन (वय ३८) आणि त्यांचा मुलगा यदुवीर (वय पाच वर्षे) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. पत्नीने पतीसह मुलाची हत्या केली असल्याचा संशय होता. प्रियकरासोबत मिळून तिनं कृत्य केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तिने बनाव रचला पण नंतर सगळा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी प्रियकरालासुद्धा ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com