पती, पत्नी और वो; डोशाने केला घात, पत्नीची पोलिसांत धाव

टीम ई सकाळ
Wednesday, 20 January 2021

एका महिलेनं तिच्या पतिविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसात गेली होती. तिने पोलिसांना सांगितलं की, पती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मंदिराबाहेर कारमध्ये बसून डोसा खात होता. 

लखनऊ - 'पती पत्नी और वो'सारखे प्रकार अनेकदा घडतात. यात कधी पती तर कधी पत्नी तिसऱ्या व्यक्तीसोबत रंगेहात सापडली की मग राडा होतो. आताही असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडला आहे. यामध्ये एका महिलेनं तिच्या पतिविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसात गेली होती. तिने पोलिसांना सांगितलं की, पती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मंदिराबाहेर कारमध्ये बसून डोसा खात होता. 

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मात्र तिच्या पतीला समज देऊन सोडून देण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं पतीवर आरोप केला की ज्युनिअर इंजिनिअर असलेला पती त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन मंदिरात गेला होता. तिला डोसा दिला आणि कारमध्ये खात बसले होते.

हे वाचा - 'वायफळ चर्चा, कंगणाचं व्टिटरनं अकाऊंट केलं बंद'

पती त्याच्या गर्लफ्रेंडला डोसा देत असताना त्याचवेळी संबंधित महिला त्याठिकाणी पोहोचली. तेव्हा महिलेचा भाऊ तिच्यासोबत होता. दोघांनी त्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं. त्यानंतर दोघांनाही जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आं आणि पोलिसांकडे तक्रार केली. 

हे वाचा - 'आंबेडकर माझे आदर्श, मी काही ब्राह्मण नाही'

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पत्नीने पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याचे अनेक महिलांशी संबंध असून तो त्या महिलांसोबत फिरतो असंही म्हटलं आहे. दुसऱ्या बाजुला पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पकडल्यानं पती मात्र यावर काही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife caught his husband with girlfried eating dosa police refuse register complaint